Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना V96 चरणान्त्य अकार हा छन्दाच्या सोयीसाठी जसा दीर्घ होोंधूं शकतो तसा तं छन्दाच्या सोयीसाठी गाळतांहि येतो. हा गाळावयाचा अकार वर्णाखाल हलचिन्ह काढून दाखविणें हें शुद्धलेखन होअील.

  • पाखरा, येशिल का परतून् ?

मत्प्रेमाने दिल्या खुणांतुनि ओक तरी आठवून् ?” (टिक १॥१४१ अशा ठिकाणों अन्त्य अक्षर अकारविरहित असूनहि तो वर्ण पाय मोडून लिहिएँ कित्येकांना चुकीचें वाटतें. जो अकार झुचारावयाचा नाही तो खुणेने तस् दाखविण्यांत चूक कोणती? तो अकार झुचारावयाचा असतो असा ज्यांना भ्रग् होतो त्यांच्या भ्रमाचा निरास करण्यासाठी वरील पद्याच्याच जातींतील संस्कृ पद्य देतों. तुलना अवश्य करून पहावी. ‘विजयते रामदूत हनुमान् यो रघुपतिनासह सुग्रीवं मैत्र्या योजितवान्' (विदप ८ ) हा अन्त्य अकार झुचारित आहे असें समजून त्याचा ओक लघु गणून अर विन्दादि भिन्न वृत्तें हिन्दी छन्द:प्रभाकरांत साडिगतलेलीं आहेत; परन्तु ह अकार अनुचारित आहे तसा गणल्यास वृत्तभेद होत नाही. झुदाहरणार्थ, छन्दः प्रभाकरांतील अरविन्द (पृ. २०७) हें वृत्त वस्तुतः दुर्मिलच होय. अकार गाळण्याची ही मोकळीक चरणान्तींच ठेविलेली आहे, अितर नाही. दैनिक बोलींत शब्दान्त्य अचा झुचार कचितच होतो; आणि जर, मग कळ अित्यादि डाक्षरी शब्दांतील अन्त्य अकार गळून झुपान्त्य अ हटकून दी होतो. तरी पद्यांत हा शब्दान्त्य अकार झुचारावा आणि झुपान्त्य अकार -हस्वच गणावा अशी वहिवाट आहे. जर मग, कळ अित्यादि शब्दांचें लगत्वलेख: (७७) असेंच होतें. बोलतो, चालतो अित्यादि शब्दांतहि मधला अकार गळू सामान्य झुचार बोलुतो, चालूतो असा होतो; तथापि या झुचाराला अद्यापे मान्यत् मिळालेली नाही. ओरव्हीचा झुचार आणि काव्यपठनांतील झुचार यांतील ह भेद स्वाभाविकपणाला थोडा मारक होतो हें निःसंशय खरें आहे. हा भेर काढून टाकिल्यास भाषेचें स्वरूप किती निराळे दिसेल या कल्पनेनेच डोळे