Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५५ यमक, यतेि, अक्षर आणि गण निर्यमक केलें होतें, तसा चूर्णिका नामक गद्यप्रकारात यमकाचा प्रवश गडक यांच्या पूर्वीच झाला होता. विनायक कोण्डदेव ओक यांनी हिन्दुस्थानकथा रसाच्या शेवटीं आपल्या अॅका मित्राच्या गद्यग्रन्थांतून जो श्रुतारा दिला आहे तो केवळ यमकचमत्कार करून दाखविण्यासाठीच रचलेला दिसतो. वानगीसाठी पुढील अॅक वाक्य पुरें हो औीलः

  • पहा पहा ! गङ्गानदीपलीकडे त्या लुङ्गाहीन कङ्गालांनी सङ्गात्यांसह

दङ्गा शिङ्गावर घेण्यांत अङ्गाकडे न पाहतां पिङ्गा घालून, ढङ्गाच्या रङ्गाने हङ्गाम समजून, झिङ्गा बरळतो त्यापरी अिङ्गा फिरला नव्हता तोपर्यंत चङ्गळ माण्डिली होती .” पद्यांत यमक हें साधारणतः चरणान्तीं आणि लागोपाठ दोन वा अधिक चर णांच्या अन्तीं साधण्यांत येतें; कारण, चरणान्तीं विराम असतो आणि यमकाने चरण जणू काय अॅकत्र बान्धले जातात. यमकाने प्रायः विषम-सम चरण बान्धले जातात; परन्तु केव्हा केव्हा यमक हें पहिल्या नि तिस-या चरणांच्या अन्तीं आणि दुस-या नि चौथ्या चरणांच्या अन्तीं साधण्यांत येतें (१) “अन्तर्बहिःस्थित रघूत्तमसूनुधाकें प्राणासि धैर्य तिळमात्र न होय जाया; मोहान्धकारपतिता विधिच्या विपाकं नेत्रे हळूच श्रुघडी रघुवीरजाया' (मोकुल ४॥३६) (२) * घनरवान्तकरा, खणतो पहा वनबिडाल महीस कसे वनीं, बहु भयङ्कर कर्कश हे महा, परम सस्पृह मूषकसेवनीं.” (मोकुल ४२१) जेथे रचना अर्धसम असते तेथे यमकें याप्रमाणे जुळविणे बरें असतें कित्येकदा यमक हें पहिल्या आणि तिस-या चरणांच्या अन्तीं जुळवीत नाहीत, दुस-या आणि चौथ्या चरणांच्या अन्तीं जुळवितात; जसें