Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५३ यमक, यति, अक्षर आणि गण जिवन्त कलाकृतेि पाहिजे. दागिन्यासाठी जातीचे सौन्दर्य विकृत करणे गह आहे यमकाच्या सोङ्गामुळे कित्येकदा नीरस पद्यच काव्याच्या नावावर खपतें. तेव्हा सयमक काव्य रचण्याचे सामथ्र्य अङ्गीं नाही म्हणून नव्हे तर खया काव्याची पारख व्हावी म्हणून निर्यमकच रचना करावी. वस्तुतः यमकाचा प्रश्न गौण आहे. पक्षाभिनिवेशामुळेच या प्रश्राला काही काळ अवास्तव महत्व आलें होतें. कविता ही आपण मुख्यत्वे करून सहानुभूतीच्या आनन्दासाठी वाचतो. चमत्कृतीची योग्य छटा कवितेंत असली तर ती आन न्दांत भरच टाकते; परन्तु कृति जितकी सहज, सुबोध आणि स्वाभाविक वाटेल तितकी तिच्यांतील चमत्कृतीची छटा हृदयङ्गम वाटते

  • अनलसमीहित साधी राया वारा महीवरा कामा

अनलस मीहेि तसा धीरा यावा रामही वराका मा ' (मोरोपन्त) यासारखी हठाकृष्ट क्रुिष्टरचना पाहिली की केवळ विस्मय वाटतो. अशा दुबधरचनेत रमणीयार्थ अत्यल्प येथू शकतो; आणि वर, कविता अर्थाकडे लक्ष देथून म्हणतांना चरणाचे जे विलक्षण तुकडे पडतात त्यांनी तर विरसच होतो. मणामणाच्या बेङया पायांत घालून अॅखादा बजरङ्ग विस्मयकारक झुड्या मारून दाखवील; परन्तु मेनकेचें पदलालित्य पहायचें असेल तर नूपुर चालतील; पण सुवर्णाचे असले तरी लङ्गर काय कामाचे ? यमकाचें बन्धन हें तालाच्या बन्धनाप्रमाणे कृत्रिमता श्रुत्पन्न करितें; परन्तु ज्या मानाने चमत्काराचें स्तोम झुणावेल त्या मानाने बन्धनाची काचणी झुणावून कलाविलासास अधिक मोकळीक मिळेल यमक अपरिहार्य नाही पण स्वाभाविक, आल्हाददायक आणि अपयुक्त आहे यमक हें सामान्यपणे आल्हाददायक आहे; आणि सयमकरचनेकडे मनुष्य प्राण्याची थोडीफार स्वाभाविक प्रवृत्तीच आहे. * आपडी थापडी-गुळाची पापडी' यासारखे प्राचीन परम्परेने आलेले बाळबोल, आणि * काखेंत कळसा गावाला वळसा ' यासारख्या म्हणी पाहिल्या की यमक जुळविण्याची प्रवृत्ति केिती स्वाभाविक आहे हे दिसून येतें. पद्याप्रमाणेच यमक हें स्मरणशक्तीस साह्य