Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५१ यमक, यति, अक्षर आणि गण भरताच्या नाट्यशास्त्रांतील

  • शङ्करः शूलभृत्

पातु लोककृत्” (भ ३२५१) मा या झुदाहरणांत यमक आहे; असें व्यञ्जनान्त यमक मराठीत फारच दुर्मिळ आहे. संस्कृतांत मात्र पहाः–

  • गर्जसि मेघ न यच्छसि तोयं

चातकपक्षी व्याकुलितोऽहम् दैवादिह यदि दक्षिणवातः चक त्वं चकाहं क च जलपातः” (पूर्वचातकाष्टक ४) भारवीच्या किरातार्जुनीयांतील पुढील लोकांत दिसून येणारें यमक कदाचित् यदृच्छया साधले गेलें असेल

  • नासुरोऽयं न वा नागो

धरसंस्थो न राक्षस ना सुखोऽयं नवाभोगो धरणिस्थो हि राजसः” (किरात १५॥१२) पहिल्या आणि तिस-या चरणांच्या अन्तीं ‘गो' या ओका अक्षराचीच आवृत्ति आहे; पण दुस-या आणि चौथ्या चरणांच्या अन्तीं आवृत्ति * असःची असल्या मुळे हें शुद्ध यमक आहे. अश्वघोषाच्याहि रचनेत मध्येच यमक स्वाभाविकपणे पण अहेतुकपणे आलेले आढळतें

  • हृदि या मम तुष्टिरद्य जाता

यथा मतौ निविष्ट वेिजनेऽपि च नाथवानिवास्मि ध्रुवमर्थोऽभिमुखः समेत अिष्टः ” (अबुच ५६९) यमक हें अपभ्रंशवाङ्मयांत सर्वत्र प्रचलित दिसतें; आणि त्या अपभ्रंश वाङ्मयाच्या द्वारा यमक मराठीत आलें असावें. जोअिन्दुकृत परमात्मप्रकाश हा अपभ्रंशवाङ्मयांतील ग्रन्थ खिस्तशकाच्या सहाव्या शतकापूर्वी रचलेला आहे हा सयमक दोहा जातींत आहे. यांतून यमकाचें अॅक झुदाहरण घे.ि