पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ५ वा.

४५

१६:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)

पाठलाग केला. रस्त्यांत त्या गृहस्थाने मोठमोठ्या आरोळ्या ठोकल्या पण त्याच्या मदतीस कोणीही धावून आले नाही. अखेरीस एका झाडापाशी त्या श्रीरूपी भूताने त्याला धरले व लोळविले आणि तें भूत त्या झाडावर जाऊन अदृश्य झाले. सकाळी त्या मनुष्याचे प्रेत गांवांतील लोकांस आढळून आले. इकडे त्याचे तिन्ही मित्रही त्या खाणावळीत मरण पावल्याचे दिसून आले."

 ५. चिनी लोकांची रोजची राहणी व खाणेपिणे अगदी साधे असते. ते अन्न बेतानेच खातात पण चहा मात्र मुबलक पितात. मासे, कोंबडी, बदके, डुकराचे मांस, तांदूळ-भात-हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. याखेरीज फ्रेंच लोकांना जसे बेडूक विशेष प्रिय असतात त्याप्रमाणे त्यांना एका जातीच्या छोटेखानी कुत्र्याचे मांस फार आवडते. परंतु अलीकडे कुत्र्याचे मांस खाण्याचा प्रचार बंद होत चालला आहे. मांसाहारापेक्षां धान्याहार विशेष श्रेष्ठ अशी चिनी लोकांची समजूत असल्यामुळे पुष्कळ चिनी लोक तांदळ व भाजीपाला यांवर निर्वाह करितात. आहारासंबंधाने चिनी तत्ववेत्यांनी पुढील समजुती प्रचलीत केल्या आहेतः--" वनस्पत्त्याहार करणारे लोक बळकट-सशक्त होतात; मांसाहार करणारे शूर होतात; नुसत्या धान्या. वर निर्वाह करणारे शहाणे निपजतात; आणि केवळ वायु भक्षण करून राहणारे ईश्वर बनतात ! " चिनी लोकांची नेहमींची राहणी जरी अगदी साधी असते तरी सणवारी ज्या मेजवान्या होतात त्या बऱ्याच थाटाच्या असतात, त्या वेळी दारू व निरनिराळी स्वादिष्ट पक्वान्न आणि फळफळावळ यांची गर्दी असते. त्या वेळी गाणीही ह्मणण्याचा प्रघात आहे. येथे हे सांगणे जरूर आहे की, चिनी दारू विलायती दारूसारखी मादक नसते. ती तांदुळापासून काढलेली असून तिचे अनेक सौम्य प्रकार तयार करण्यांत येतात. ती ऊनकढत-असतांनां घेण्याची वहिवाट आहे. तसेंच तिकडील दारूचे पेलेही युरोपांतील पेल्यांपेक्षां पुष्कळ लहान असतात. यामुळे ते थोडेसे कमजास्त झाल्यास त्यापासून दारू पिणारास फारसा त्रास होत नाही असें ह्मणतात. चीनमध्ये मागें एके वेळी दारूचें महात्म्य बरेंच होते; पण अलीकडे ते फारच कमी झालेले आहे. पुष्कळ सभ्य गृहस्थांच्या मेजवान्यांत दारूचा गंध देखील नसतो. तसेंच दारू पिऊन कोणी रस्त्यावर अगर गटारांत पडल्याची उदाहरणेही चीनमध्ये आढळून येत नाहीत. चिनी धर्मशास्त्रवेत्ते व नीतिशास्त्रवेत्ते यांनीही दारू वर्जच ठरविलेली आहे.