पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
चीनची संक्षिप्त माहिती.

१६:०४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:०४, ६ डिसेंबर २०२३ (IST)

बाप मेले' याच्या ऐवजी ' आईबाप नाहीत; ' एखादा अधिकारी मेल्यास " तो पगार मिळवित नाहीं ' अगर ' तो जुनापुराणा झाला आहे; ' पेटींत घातलेल्या प्रेतास ते लांबच्या घरांत आहे; ' तें पुरल्यानंतर ' तें जुन्या कालांतील शहरांत आहे ' अथवा ' रात्रीच्या पोटांत आहे' असें झणण्याचा प्रघात* आहे.

 ४. भुताखेतांसंबंधाने चिनी लोक इतके भित्रे असतात कीं, सामान्य चिनी मनुष्य रात्रीच्या वेळीं बिनरहदारीच्या ठिकाणी सहसा जात नाहीं. एखाद्या पडक्या व ओसाड घरांत तो दिवसा देखील जाण्यास धजत नाहीं. भुताखेतांसंबंधी ज्या कमी अधीक भयंकर गोष्टी तिकडे प्रचलित आहेत त्यांचा तिकडील तरूण व धीट लोकांवरही विलक्षण परिणाम घडून त्यांच्या पोटांत भीति उत्पन्न होते. मासल्याकरितां दोन गोष्टी येथे देतो:-

" एकदां एक मनुष्य आपल्या उशाशी दारूची बाटली - रात्री पिण्या करितां टेऊन बिछान्यावर पडला. पुढे कांहीं वेळाने त्याने जेव्हां त्या बाटली- कडे आपला हात नेला तेव्हां त्याला आपला हात धरून कोणी तरी आपणास जमिनींत ओढून नेत आहे असे वाटल्यावरून तो मोठ्याने ओरडला. त्याचें ओरडणें चालू होतें व भूत त्याला जमिनीत गाडून त्याच्या उरावर माती लोटीत होते; इतक्यांत आसपासची शेजारची मंडळी जागी होऊन तेथे आली व त्यांनीं त्याला सोडविलें. मंडळीचा जमाव पाहतांच भूत गुप्त झालें ! ”

गोष्ट दुसरी:-

 " एके दिवशी रात्रीं ४ प्रवाशी एका खाणावळीत येऊन उतरले. ते ज्या खोलीत उतरले त्यांत त्या खाणावळवाल्याच्या सुनेचे प्रेत पेटींत घालून ठविलें होतें. रात्री जेवण झाल्यावर त्या ४ प्रवाशांपैकी तिघांस गाढ झोप लागली व एक जागा होता. कांहीं वेळाने त्या पेटींतील स्त्री उठून उभी राहि- याचा त्याला भास झाला. पुढे लवकरच ती स्त्री त्याच्या झोपी गेलेल्या मित्रांजवळ येऊन त्यांस तिने हुंगल्याचे त्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. नंतर ती जेव्हां त्याच्याजवळ आली तेव्हां घाईनें त्यानें आपली विजार चढवून दर- वाजाकडे पोबारा केला व दार फोडून तो बाहेर पडला. त्या स्त्रीने त्याचा


 *आमच्याकडे ज्याप्रमाणे बांगड्या फुटल्यास 'बांगड्या वाढल्या 'व कुंकु सरल्यास ‘कुंकु वाढलें ' असे झणतात त्यांतलाच हा प्रकार दिसतो.