पान:चित्रा नि चारू.djvu/७८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "चित्रा, काय आहे त्या पत्रात ?"

 आनंदाची वार्ता फातमाने लिहिली आहे. तिला बाळ होणार आहे. तुझा पायगुण असे लिहिले आहे.

 “तू नाही वाटते तिला तुझी वार्ता कळवलीस ? "

 "बाळ पाळण्यात पडला म्हणजे कळवीन.”

 "परंतु तुझे बाळंतपण येथे करावयाचे की माहेरी ?"

 "तुझ्या मळ्यात होऊ दे माझे बाळंतपण. सीतादेवी वाल्मीकींच्या आश्रमात प्रसूत झाली. मी माझ्या फुलांच्या, केळींच्या मळ्यात होईन. हसतोस काय चारू ? "

 "तू वेडी आहेस म्हणून हसू येते."

 "वेड्या बापाची वेडी मुलगी ! खरे ना ? "

 दोघे गोड हसली. किती त्यांचे परस्परांवर प्रेम ! त्या प्रेमावर दृष्ट न पडो, चित्रा नि चारू यांचा संसार सुखाचा होवो !


चित्रा नि चारू.djvu८० * चित्रा नि चारू