पान:चित्रा नि चारू.djvu/७४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 सीताबाई जप करीत होत्या. मुले शाळेत गेलो होतो. भोजू दुकानात सामान आणायला गेला होता.

 "सीताबाई. "

 "कोण ? "

 "मी डॉक्टर. "

 " काय हो डॉक्टर ? "

 "हे हॉस्पिटलचे डॉक्टर आले आहेत. त्यांच्याबरोबर हे एक मुसलमान आमदार आहेत. तुमची चित्रा सापडली. "

 "सापडली ?

 “होय हो."

 त्या मातेच्या डोळ्यात पाणी आले.

 "देव पावला. आता यांचे वेड जाईल ना डॉक्टर ? "

 “होय हो. परंतु बातमी एकदम नाही सांगायची. मनाची तयारी करायची." हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले.

 "चित्राला येथे आणू ? " आमदारांनी विचारले.

 "हो." सीताबाई म्हणाल्या.

 "आणि मुलीचे यजमान कोठे आहेत ?"

 "तेही तिचा शोध करीत हिंडत आहेत."

 "आपण वर्तमानपत्रात देऊ. म्हणजे ते असतील तेथे वाचतील. येतील. सारे गोड होईल आई. तुमची मुलगी शुद्ध, पवित्र आहे. तिचे शील निष्कलंक आहे. कसली शंका नको. आले होते दुर्दैव. गेले ! "

 " देवाची कृपा."

 "अच्छा. जातो मी."

 "बसा हो. सरबत तरी घ्या. बसा डॉक्टर, तुम्हीही बसा डॉक्टर."

 तिघे बसले. इतक्यात भोजूही आला.

 "हा हो भोजू." हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले. भोजूने आमदारसाहेबांस प्रणाम केला. सरबताचे पेले भोजूने सर्वांना आणून दिले. नंतर लवंग, सुपारी, वेलदोडा देण्यात आला.

 "जातो हो आई. " आमदार म्हणाले.

७६ चित्रा नि चारू