पान:चित्रा नि चारू.djvu/५७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "बरे होईल का हो वेड?" सीताबाई आशेने मंदिरातील डॉक्टरांना विचारीत.

 " होईल हो बरे. तुमची चित्रा सापडली, तर एका क्षणात वेङ जाईल." ते म्हणाले.

 "कोठे गेली चित्रा ?" सीताबाई रडू लागल्या.

 "सापडतील. दत्तराजाची कृपा होईल, ” डॉक्टरांनी धीर दिला.

 "तुमच्यासारखी चांगली माणसे भेटली ही देवाचीच दया. हा भोजूच पाहा. देवानेच जणू तो आम्हाला दिला. देव दयाळू आहे. तो आणखी थोडी दया नाही का दाखवणार ? दाखवील, दत्तगुरु सारे चांगले करतोल." असे सीताबाई आशेने परंतु स्फुंदत म्हणाल्या.

चित्रा नि चारू.djvu
चित्राच्या वडिलांना वेड लागते * ५९