पान:चित्रा नि चारू.djvu/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चि त्रा व र
सं क ट

♣ * * * * * * ♣








  चित्रा काही दिवस माहेरी गेली होती. आईच्या हातचे खायला गेली होती. प्रेमळ वातावरणात गेली होती. तिची प्रकृती बरी होतो. सासूने हाल केले वगैरे तिने काही सांगितले नाही.

 "आई, फातमाचा लागला का ग पत्ता ? " तिने विचारले.

 "लागला असता तर कळवला असता. तिचे आजोबा वारले. लग्न झाल्यावर नवच्याकडे गेली. परंतु नवरा कोठे असता कळले नाही."

 "आई, आता परत कधी मला आणाल ?”

 "बाळंतपणासाठी ये."

 "आई, तुला मी एक सांगू ?"

 "काय ग ? "

 "काही नाही."

 "सांग. का नाही सांगत ? "

 "मनात येते एखादे वेळेस, की पुन्हा तुमची-माझी भेट होणार नाही. कदाचित् मी मरेन.

 "हे काय वेडे वेडे मनात आणतेस? असे नको हो मनात आणू. चांगला नवरा मिळाला आहे. सुखाचा संसार कर. आज ना उद्या मूलबाळ होईल. सारे चांगले होईल. वेडी आहेस तू चित्रा!"

 "आई, मनात येते ते सांगूही नये का ? तू मायेची म्हणून तुझ्याजवळ म्हटले."

 " परंतु आनंदात राहा. समजलीस ? तुला लवकर लवकर आणीत जाऊ हो. बाळंतपणालाच येशील असे वाटले होते, परंतु एखादीला नाही

चित्रावर संकट * ३९