पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दे तो जन्मचि तात कर्म परि हे *तात्यामुळे ज्या मिळे, पुण्ये पूर्वकृतेंच जो सुमतिचा दाता मला आढळे, ऐश्वयों न चळे, ढळे न सहसा कर्तव्यकर्मवतीं, गेला सोडुनि नीळकंठहि* मला तो दिव्यलोकाप्रती; साजे पंडित पंडितांत, मिरवे वक्त्यांत वक्ता तसा, पुण्यश्लोक जया उठोनि ह्मणते अत्यादरें या वसा!' दिक्प्रांत स्वयशे भरी, निजगुणे चित्तें जनांची हरी, स्वर्गारोहण तो अजातरिपुही । तेलंगनामा करी; योगाभ्यास करी न जो पद तरी योगीश्वराचें वरी, होई वंद्य जनांहि वंद्य नव्हता जो ब्रह्मवेत्ता तरी, सोडीना व्यसनीहि शांतनवशी शांतीस ज्याची मति, 4.मामा तोहि निघोनि जाय परमानंदप्रदेशाप्रति; दैवाने असतां चुकोनि खरडी घासावया लाविला मानी बुद्धिबळेच पंडितपदा जो आपल्या पावला, ज्याचे सायणमल्लिनाथहि सुखें होऊ पहाते सखे, विद्वद्रत्नहि काळ तस्कर हरी तें शंकरासारखें; वर्षे चार सुभाषिती सुरुचिरी 'मित्रोदयीं' त्या जसा झाला लोकमनांस जो रमविता 'इंदुप्रकाशी' तसा, शांतीचा पुतळा सती सुमतिचा आनंददायी मळा गोविंदात्मज तो गणेशहि भला सायुज्यता पावला; विद्वत्तेत नसोनि पंडित जगन्नाथाहुनी जो उणा अंगीं वागवितां न लेशहि जया आला कधी मीपणा, तोही लक्ष्मण परामचंद्र करुनी संसारयात्रा पुरी गेला सोपुनि ‘भामिनीविलसिता' ह्या आळशाच्या करीं; लोकी वाढवुनी पुरातन कथाकाव्येतिहासी रती, ज्योतिःशास्त्रविदांहि जो शिकविता झाला ग्रहांच्या गती, शिष्यी मागितला गुरु प्रतिभवी ज्या मोडकासारखा तोही काळमुखीं $ जनार्दन पडे विद्वज्जनांचा सखा; । * नीळकंठ महादेव मोगरे. + काशीनाथ त्रिंबक तेलंग. नारायण महादव परमानंद. यांस त्यांचे इष्टमित्र मामा ह्मणत असत. शंकर पांडुरग पाडत. 10 गणेश गोविंद नाडकणी. बालक्ष्मण रामचंद्र वैद्य. जनादन बाळाजा मोडक