पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चार चरित्रात्मक लेख. असते तिचा प्रस्तुत काळाचे संबंधाने निर्वाह लागतो. परंतु वास्तविक समाधान होत नाही. याचे कारण प्रस्तुत जन्म हे पूर्वजन्माचे प्रतिबिंब होय, व पूर्वजन्म त्याचे पूर्वीच्याचे होय, असें करतां करतां अगदी प्रथम जन्मापर्यंत गेलो तर ते वेळेस ही अचाट बुद्धि त्या पुरुषास अवश्य असली पाहिजे. नाही तर प्रतिबिंबाचें पौन:पुन्य संभवत नाही. तेव्हां प्रथमजन्मी तरी त्या पुरुषाला का विशेष बुद्धि असावी असा सहज प्रश्न निघतो. त्याचे उत्तर-'ईश्वरेच्छा!' तेव्हां प्रथम जन्मीं काय किंवा प्रस्तुत जन्मी काय, जर एकच उत्तर द्यावे लागते, तर इतकी पूर्वजन्म समजण्याची खटपट तरी कशाला करावी ? असो. एतावता यापासून इतकेंच निष्पन्न झाले की, सृष्टीमध्ये नियम सोडून कांही असे प्रकार घडतात की, त्यांजविषयी काही समाधान होण्याजोगें सांगवत नाही. जसे निरनिराळ्या सृष्टिप्रकारांत सर्व नियम सोडून अद्भुत ह्मणून एकादी गोष्ट केव्हां केव्हां घडून येते, तशीच अचाट बुद्धीची देणगी ही होय. ही देणगी फारच थोड्यांचे वांट्यास येते. असे पुरुष तुरळक तुरळक कोठे कोठे आढळतात. ह्मणूनच अशांची लोकांना फार आवड असते. अशाच पुरुषांचे कोटींतील कृष्णशास्त्री चिपळणकर हे होत, हे त्यांच्या चरित्रावलोकनाने स्पष्ट कळेल. आतां शास्त्रीबोवांचें चरित्र जसें माहीत असावे तसे फारच थोड्यांस माहीत असेल; व ते लोकांना समजण्याचा कधी सुयोग येईल तो खरा. या संबंधाने आमचे कित्येक वर्तमानपत्रकारांनी शास्त्रीबोवांचे स्नेहीमंडळास पुष्कळ सूचना केल्या आहेत, तेव्हां या बाबतीत काही विशेष लिहीत नाही. शास्त्रीबोवांसारख्या थोर पुरुषाचें चरित्र नि:पक्षपातानें कोणी लिहिले तर लोकांना सद्वर्तनावलंबार्थ व दुर्वर्तनत्यागाथ एक चांगला धडा घालून दिल्यासारखे होईल. तेव्हां शास्त्रीबोवांचे इष्टमित्रांपैकी यांस त्यांचेविषयी विशेष माहिती असेल, त्यांनी ती एकत्र करून व दुसरी माहिती मिळवून त्यांचे साद्यंत चरित्र रचून प्रसिद्ध करावे अशी त्यांस आमची सचना आहे. आमचे इकडे थोड्या काळापूर्वी कित्येक विद्वान् व लोककल्याणार्थ मनापासून झटणारे असे पुरुष निवर्तले. त्यांचे इतिवृत्त व लेख लोकांपुढे नेवण्याचे काम कित्येक विद्वान् पुरुषांनी अंगांवर घेतले आहे असा वर्तमानपत्रा तून पुकारा ऐकू आला, व त्यालाही बरेच दिवस झाले; परंतु त्याप्रमाणे आजवर फळ दृष्टीस पडत नाही, ही मात्र शोचनीय गोष्ट होय. त्याप्रमाणे शास्त्री