पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्रकाशकांचे दोन शब्द.


 मराठी वाङ्मयांत उत्तम लेखक ह्मणून ज्यांची प्रसिद्धि आहे, त्यांत कै० हरि माधव पंडित यांची प्रमुखत्वानें गणना होते. यांचा स्वतंत्र असा एकही ग्रंथ प्रसिद्ध नाही. यांनी मराठी भाषेची जी अमोलिक सेवा केली, ती मुख्यत्वेकरून विविधज्ञानविस्तार मासिक पुस्तकाच्या द्वारे होय.
 हरिपंत पंडित यांचे सविस्तर चरित्र त्यांचे वडील चिरंजीव बळवंतराव पंडित, बी. ए., यांनी लिहिलेले विविधज्ञानविस्ताराच्या १९०१ सालच्या डिसेंबर