पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे; ते वाचून पाहिले असतां हरिपंतांची वास्तविक योग्यता समजून येणार आहे. हरिपंतांचे हे चरित्र वाचून, त्यांचे लेखनव्रत चालविण्यास त्यांचे चिरंजीव सर्व प्रकारे योग्य आहेत, हे पाहून अत्यंत समाधान होतें.
 हरिपंतांचा जन्म सांगलीनजीक हरिपुर येथे १८४९ सालच्या २१ दिसेंबरास झाला, आणि नागपुर येथे १८९९ सालंच्या १५ मार्चास ते मृत्यु पावले. घरची यांची गरीबी असे. त्यांचा मराठी अभ्यास आटोपल्यावर वडिलांनी त्यांस मुंबईस आणले आणि स्वतः पुराण सांगण्याचा धंदा पत्करून मुलाचे इंग्रजी शिक्षण चालू केले. १८७२ साली ते बी. ए. च्या परीक्षेस बसले; परंतु दुर्दैवाने नापास झाले. प्रापांचक अडचणींमुळे यापुढे अभ्यासाचा नाद सोडून त्यांस नोकरी पत्करावी लागली. डा. रामकृष्णपंत भांडारकर यांच्या शिफारशीने त्यांस १८७२ साली नागपुरास 'सिटी स्कूल च्या हेड मास्तरची जागा मिळाली. या पुढील त्यांचे एकंदर आयुष्य नागपूर प्रांतांतच गेलें, आणि नागपुर हे त्यांचे कायम वसति- स्थान झाले. महाराष्ट्रास जसे माधवराव रानडे, वऱ्हाड प्रांतास जसे अण्णासाहेब महाजनी, तसे नागपुर प्रांतास हरिपंत पंडित होते.
 विविधज्ञानविस्ताराच्या तिसऱ्या सालापासून लेखक या नात्याने हरिपंतांचा त्याच्याशी संबंध जडला, आणि सातव्या वर्षांपासून तो त्यांच्या मृत्यूपर्यंत वि- स्ताराचे तेच संपादक होते. त्यांनी विस्तारांत जे अनेक लेख लिहिले त्यांत पुढील लेख स्वतंत्र ग्रंथरूपाने प्रसिद्ध होण्यालायक आहेत. १ नागपुरकर भोंसले यांचा इतिहास. (याची एक स्वतंत्र आवृत्ति निघाली होती. परंतु ती आतां दुर्मिळ आहे.) २ भवभूतीच्या श्रीमहावीरचरिताचे गद्यपद्यात्मक भाषांतर. (यांत आरंभी त्यांस कै. वामन केशव मावळंकर यांचे साह्य होतें.) ३ श्रीमन्नारायणराव पेशवे नाटक.
 यांचे चवथें पुस्तक क्षेमेंद्र कवीच्या चंडकौशिक नाटकाचे गद्यपद्यात्मक भाषां- तर होय. हे माजी — 'दंभहारकां'तून प्रसिद्ध झाले आहे.
 याशिवाय यांचे वि. ज्ञा. विस्तारांत प्रसिद्ध झालेले अनेक लेख आहेत. त्यां- पैकी त्यांचे चार “ चरित्रात्मक लेख " या पुस्तकद्वारे मराठी वाचकांस अर्पण करीत आहो. हरिपंत टीकाकार ह्मणून विशेष प्रसिद्ध आहेत. तेव्हा त्यांच्या