पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटते. या मानसिकतेत असलेला स्त्रीसमाज मात्र चांदवडच्या शिदोरीतून, अमरावतीच्या आयुधांतून, शेगावच्या चतुरंग शेतीतून, पंचायत राजच्या खऱ्या ग्रामविकासातून, औरंगाबाद येथील प्रचीतीच्या देण्यातून, रावेरीतील सीतेच्या सामर्थ्यातून खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत उतरण्याची क्षमता आपल्या अंगी बाणण्याचे धाडस ठेवते. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांसारख्या पूजनीय स्त्रीसमाजाची परंपरा असलेली स्त्री आरक्षित असण्याचा शिक्का लावून घ्यायला तयार नाही. उलट भ्रष्ट राजकारणातून स्त्रीसमाजाची अधोगती झालेली दिसते. देशभर सर्वदूर असुरक्षिततेची टांगती तलवार स्त्रीचळवळीच्या डोक्यावर आहे. ही तलवार बाजूला करून, या चळवळीचे खच्चीकरण थांबवून योग्य मार्गाने चालण्याची वाट म्हणजेच शेतकरी महिला आघाडीचे संपूर्ण साहित्य होय. हे साहित्य एकत्रित आल्याने ते स्त्रीचळवळीला दिशादर्शक म्हणून उपयोगी ठरेल यात शंका नाही.
 आ. शरद जोशींच्या अमृतमहोत्सवी वर्षाला या पुस्तकाच्या रूपाने स्त्रीचळवळीला शरदभाऊंनी दिलेली प्रेमळ भाऊबीजच आहे.

सौ. सरोज काशीकर

वर्धा

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ११