पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
चांदण्यांतील गप्पा

 या सभोवतालच्या ओंबन्या त्याने लावण्यवतीचे स्मारक म्हणून बांधल्या व त्यास 'लावण्यमद्दाल' असे नाव टेविले. परंतु समाधि या अशाच उघडया राखल्या, आणि त्या तशा नसल्या कर तेथें परस्थ कोणी आला तर त्याला जिज्ञासाद्दी झाली नसती, परंतु या समाधि उघड्या असल्यामुळे कोणाच्याही मनांत ही गोष्ट सहज

 की, ज्याने हा एवढा मोठा महाल बांधण्याचा खर्च केला त्याने समाधि कशा या ठेविल्या? अशा जिज्ञासेनें तरी त्या पवित्र भक्तिणींची व त्या प्रेमळ उपसिंहाची लोकांस माहिती होते.

 स्वरूपसिंह जेव्हां वारला तेव्हां त्यानेही आपली अशी इच्छा प्रदर्शित केली होती कीं, आपले शव ह्या दोन समाधींच्या मागेच ठेवावे. आणि त्याप्रमाणें त्याच्या माणसांनी केलेही म्हणतात. ते ठेवल्यावर कांही दिवसांनी हॅ बकुळीचें झाड त्या जागेवर आपोआप उगवले, आणि आतां किती तरी दिवस झाले, माझ्या आजापंजाच्या वेळची गोष्ट असेल, तेव्हांपासून हे झाड आहे एवढेंच आहे. मी तर आपल्या बाळपणापासून पाहतो आहे, हे झाड आहे तेवढेच आहे. स्वरूपसिंहाचे लावण्यवतीवरील प्रेमच जणुं या बकुळीच्या रूपाने व्यक्त झालें आहे ! हें झाड केव्हां सुकत नाहीं, कोणत्याही ऋतूंत त्याला फुले येत नाहीत, असें होत नाहीं. नित्य सकाळी यादें तो या दोन समाधीवर फुलांचा सडा झालेला असतो. ते वाढत नाहीं. जणुं आपल्या प्रियेच्या शरीरात आपल्या मुळ्या सुपतील व उंच झाले असतां प्रियेच्या समाधींत व आपल्यांत अंतर पडेल असे समजूनच ते आहे तसेंच राहिले आहे ! याला म्हणावें प्रेम ! चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हैं बकुळीचें झाड मला वाटते आपल्या प्रेमाची कहाणी सांगत असेच राहाणार!

आजोबा म्हणाले: 'ही गोष्ट संपते तो बहुतेक उजाडलेच होतें. विरक्ति साधूचीही गोष्ट ऐकावी म्हणून माझी इच्छा होती. परंतु मंडळींनी आजचा मुक्काम केला तर ती ऐकणे शक्य आहे, असे वाटून मी तेथून नित्यकर्मास उठलों; तेव्हां आतां तुम्ही जा. आपल्या अंथरुणावर निजा जाऊन !" असे म्हणून ते उठू लागले; इतक्यांत कोही मुले म्हणाली, 'पण आजोबा ! उद्यां विरक्ती साधूंची गोष्ट सांगाल ना ? अगोदर कबूल करा, मग आम्ही जातों निजायाला.'

 'अरे ! होय, होय, बेटयानों!' असे म्हणत म्हणत आजोबा आपल्या झोपडीत निघून गेले व आम्हीही आपआपल्या झोंपडींत निजावयास गेलो.