पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

१०७

कवरी कवरी माया जोरी, सुरत हरी निज धनमो ||
दस दरवाजे घेर लिय तब, रहि गइ मनकी मनमो ॥ ४ ॥
पगिया बांधे पग सवारे, तेल फुलेल झुलपनमो |
कहत कवीरा सुनभाई साधो, ये क्या लढे रनमो ॥ ५ ॥

 दुसरे दिवशीं प्रातःकाळीच स्वरूपसिंहाचा सर्व लवाजमा मार्गस्थ झा फक्त स्वरूपसिंह मात्र तेथें राहिला. त्याने प्रतिज्ञा केल्याप्रमाणे तो लावण्यवर सेवा अंतःकरणपूर्वक करूं लागला, व तिच्या आणि विरक्ती साधूच्या सहवासे तो त्या दोघींसारखाच बनला.

 फकीर म्हणाला “ या रानाच्या आसपास या दोन साधूंची मोठी ख्याती होती. ज्याप्रमाणे लावण्यवतीनें आपलें तनमन गुरु विरक्तीच्या पायीं अर्पण केले, त्याचप्रमाणे स्वरूपसिंहाने लावण्यवतीच्या पायांवर आपले तनमन अर्पण केलें होतें. या दोन्ही महान् भगवद्भत्तिणींच्या दर्शनास लांव लांवचे लोक येत असत. त्यांच्या दर्शनानेंच त्यांच्या मनावर वैराग्याचा ठसा उमटे. त्यांच्या भजनाचे वेळीं तर कित्येकांना प्रत्यक्ष भक्तीच मनुष्यदेह धारण करून मृत्युलोकों भजन करण्यास आली आहे असे वाटे. ( त्यांपैकी एका समाधीकडे बोट दाख वून ) बावा ! ती ही समाधि त्या राजकुलोलन महावैराग्यशील लावण्यवतीची आहे, आणि ही दुसरी विरक्ति साधुची आहे. आणि हा वकुळीचा एवढाच आज कैक वर्षे राहिलेला वालतरु त्या स्वरूपसिंहाचे स्मारक म्हणून उभा आहे. या दोन समाधि उघड्या असण्याचे कारण लावण्यवतीनें समाधिस्त होतेवेळीं स्वरूप. सिंहास सांगितले होते की, 'तुझ्या इच्छेप्रमाणे तूं सर्भोंवती वाटेल तेवढा वाडा बांध; पण गुरुविरक्ति व मी या दोघींच्या वर आच्छादन नको. कारण, त्या प्रभूची इच्छा आम्ही मनुष्यकृत वाड्यांत वास करावा अशी नाहीं, आणि म्हणूनच राजवाड्यापासून अरण्यापर्यंत त्याने मला चित्रपटाप्रमाणे सर्व देखावा दाखविला, व येथें अरण्यवासांतच जास्त सुख आहे अर्से अनुभवास आणून दिले, तेव्हां त्याच्या इच्छेप्रमाणे मी या सुंदर आकाशरूपी छताखालीं व ह्या भूमिरूपी गालिच्यावरच अक्षयीं शयन करावें, हॅच योग्य आहे. त्या तिच्या इच्छेप्रमाणेच स्वरूपसिंहानें केलें.