पान:गोमंतक परिचय.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय प्रकरण पहिले. गोमंतकाचा भूगोल. 40:०:०८३सामान्यवर्णनः-उत्तरेस तेरेखोलची खाडी व सावंतवाडी प्रांत, दक्षिणेस कारवारांतील माजाळी गांवची हद्द, पूर्वेस सह्याद्रीची गगनभेदी रांग व पश्चिमेस आरबी समुद्र अशा सीमांनी कवटाळलेला कोंकणचा एक भाग, आज बरीच वर्षे गोमंतक, गोवें या नावांनी ओळखला जातो. परंतु फिरंगी सत्तेखाली यावयाच्या पूर्वीच्या काळांत गोमंतकाची मर्यादा मुडगेरी गांवापर्यंत जात असे. पण आम्हांला आज या प्राचीन सीमाचे तेवढे महत्व वाटत नाहीं; कारण पोर्तुगीज अमलाखालच्याच प्रांतविशेषाचा परिचय करून देण्यासाठी असलेल्या या पुस्तकांत अशा प्रकारच्या इतिहाससंशोधनाचा विषय असलेल्या माहितीचा आम्हांला उपयोग नाही. सामान्यतः हा लहानसा टापू त्रिकोणाकार दिसतो. त्याची दक्षिणोत्तर लांबी १०५ किलोमिटर (६५ मैल) असून पूर्वपश्चिम रुंदी ६० किलोमिटर (३७ मैल) आहे. क्षेत्रफळ ३८०६ चौरस किलोमिटर (१४८२ चौ. मै.) असून १९२१ च्या शिरगणतीने लोकसंख्या ४,६५,४९४ ठरली आहे. ह्यांपैकी २,४५,४९९ क्याथोलिक, २,१८,२२३ हिंदु, ५,४८७ मुसलमान व बाकीचे इतर धर्मीय आहेत. पूर्व गोमंतक हा सह्याद्रीच्या उतरणींतच वसला असल्याने तो प्रदेश बराच डोंगराळ आहे; त्यामुळे त्यांतील लोकवस्तीहि पातळ व जमिनी गर्द अशा जंगलाने व्याप्त आहेत. सत्तर प्रांत, सागें कोसेल्य व काणकोण कोंसेल्याचा पूर्वभाग ह्याच प्रदेशांत बसतो. त्या मानाने पेडणे कोंसेल्य व फोंडे कोंसेल्य बरेच कमी डोंगराळ आहेत. तरीपण फोंडे कोसेल्य हा अघशी नदी व दुधसागरची नदी अशा दोन प्रवाहांच्या चिमट्यांत वसला असल्याने तोहि बराच डोंगराळ आहे.