पान:गोमंतक परिचय.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे.. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे, प्रांतिक स्वायत्ततेमुळे उत्पन्न झालेले " आवदीतोरीय फिश्काल" नांवाचे ऑफिस होय. स्वायत्ततेच्या कायद्यामुळे जमाखर्चाच्या बाबतींत पोर्तुगीज हिंदुस्थान स्वतंत्र बनलें व जमाबंदी खात्याची पुनर्घटना होऊन तिच्या अन्वयें 'दिरेक्सांव दुश सेव्हीसुश द फाझेंद' हे नांव त्या खात्याला मिळून जमाखर्चाच्या बाबी निश्चित झाल्या. त्यांच्या कायदेशीरपणाबद्दल व योग्यायोग्यतेबद्दलचा निर्णय देण्याचा अधिकार उपरोक्त आवदितोरीकडे सोंपविण्यांत आला. मागाहून बऱ्याच फेरफारानंतर हा अधिकार काही अंशी मागे सांगितलेल्या त्रिबुनाल आदमिनिस्त्रातीव्ह फिश्काल ई दश कोंतश या मंडळाकडे व काही अंशी पोर्तुगालच्या वसाहत मंडळाकडे जाऊन १९२६ साली आवदीतोरीय हे खातें नष्ट करण्यांत आले. ____करांच्या बाबतींत, इ. स. १९१६ साली सांगें व फोंडे कोसेल्यांना प्रेदियाल लागू करण्यांत आले व पूर्वकालीन कागदपत्रावरून तेथील " फोर" प्रेदियालाच्याच स्वरूपाचा ठरल्यामुळे तो रद्द करण्यांत आला. ___ पोटकचेऱ्यांपैकी डिचोलीची पोटकचेरी काढून टाकण्यात आली व सत्तर प्रांतांत १८९८ सालाप्रमाणे जमाबंदीचे ठाणेच राखण्यांत आले. सरकारी जमाखर्चः-सरकार सल्लागार मंडळाच्या जानेवारीतील बैठकीत जमाखर्चाचे अंदाजपत्रक चर्चेस येत असतें. हिशेबी साल जुलई ते जूनचें धरतात. १९२७ ते १९२८ ह्या सालीं पोर्तुगीज हिंदुस्थानचे एकंदर उत्पन्न ५२,६४,६४७ रुपये होते. उत्पन्नाच्या मुख्य मुख्य बाबी खाली दिल्या आहेत. आंकडे हजारांचे आहेत. प्रेदियाल ( जमीन महसूल) फोर ( कोमुनदादी वगैरेकडून येणारा जमीनीचा मालकी हक्क ) १६९ व्याजावरील शें. १२ टक्के कर ११९ स्टांप ५५४ ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी १५५ अबकारी उत्पन्न १०१२ नारळीची सूर काढण्याचे ____ परवाने, झाडामागे १० रु. प्रमाणे ५६० दारू गाळण्याचे परवाने गुत्त्यांचे परवाने दमण व दीव येथील महुडाव खजूर इत्यादि दारू गाळण्याचा फायदा १८९ जकातीचे उत्पन्न १७५० १४४ ११९