पान:गोमंतक परिचय.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय दहा रुपयांवरील कर भरणाऱ्या खातेदारांना दोन हप्त्यांनी सारा भरावयाची सवलत दिलेली आहे. पहिला हप्ता जानेवारी अखेर व दुसरा मे अखेर असे भरावयाचे असतात. त्यांतही जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यांत कोंसेल्यांतील खजीनदाराने नेमलेले फिरते वसूलदार प्रत्येक गांवांत किंवा गांवाच्या गटांत वसुलासाठी जात असतात. दहा रुपयांखालचे खातें किंवा त्या वरच्या खात्यांतील पहिला हप्ता जानेवारीत भरला नसल्यास, त्यावर शेकडा तीन प्रमाणे व्याजाची सहामाहीची एकदम आकारणी होते. मे अखेर न भरतां राहिलेल्या प्रेदियालाच्या खातेदारांना जूनच्या पहिल्या आठवड्यांत भरपाईच्या सूचना (aviso) जातात. इतक्याहिउपर न भरणारांची नांवें गांवच्या रॅजिदोराकडे जातात व ही दुसरी सूचना देण्यांत येते. आणि त्या सूचनेनंतरच खातेदाराला वसुलीखात्यामार्फत दहा दिवसांत भरणा करण्याचे समन लागू करण्यात येते. दहा दिवसांत खातेदाराने भरपाई न केल्यास, त्याच्या घरसामानाची किंवा जमिनीच्या एका वर्षाच्या उत्पन्नाची जप्ती पुकारण्यांत येते. जप्तीचा विषय कोणता असावा हे खातेदाराच्या मर्जीवर अवलंबून असते. मात्र हा निर्णय त्याने समन लागू झाल्यापासून दहा दिवसांच्या मुदतीत कळविला पाहिजे. पुढे जप्त केलेल्या वस्तूचा किंवा उत्पन्नाचा जाहीर लिलाव होतो. व त्याने देखील भरपाई न झाल्यास ऐन जमीनच लिलांवास काढण्यासाठी न्यायखात्यांत कागद रवाना होऊन जमिनीचा लिलाव होतो. अशी ही वसुलाची पद्धत आहे. रिपब्लिक नंतरची घडामोड:-रिपब्लिकच्या स्थापनेनंतरची पहिली घडामोड म्हणजे, मागें सांगितलेल्या अंदाजपत्रकाच्या पोर्तुगीज नाण्यांतून झालेल्या आकारणीमुळे, प्रजेवर बसलेला शेकडा सव्वाचौदा टक्कयाचा वाढावा होय. १९१३ साली युरोपियन अम्मलदारांनी व लष्करी अम्मलदारांनी अशी तक्रार केली की, पोर्तुगीज नाण्याची पत पूर्वीपेक्षां वाढली असून रुपयाची किंमत ४०० रेसांऐवजी ३२ रेसांवर आली आहे. अर्थात् त्या मानाने पोर्तुगालांत ज्यांना पैसे पाठवावे लागतात अशा नोकरांचे नाहक नुकसान होत आहे. त्यासाठी रुपयाची किंमत बाजारभावाप्रमाणे धरून त्यांना पगार देण्यांत यावा. अंदाजपत्रक पोर्तुगीज नाण्यांत होते व त्याचा बटवडा तत्कालिन हुंडणावळीप्रमाणे धरल्यास त्यांत तिजोरीचे नुकसान निश्चित ठरले होते. तत्कालिन गव्हर्नर कौसेर दा कोश्त यांनी त्या तक्रारीस प्रारंभी किंमतच दिली नाही. परंतु मागाहून तक्रारी ऑफीसरांनी संपाची तयारी केली. तेव्हां रुपयाची किंमत ३५० रैस धरून पगारवांटणी करण्यात आली. अर्थातच पूर्वीच्या १०० रुपयांऐवजी आतां ११४४४८७ देणे भाग झाले.