पान:गोमंतक परिचय.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. स्वरूपाच्या गुन्ह्यांना व मुद्देमालासकट पकडल्या जाणाऱ्यांना मात्र हे कलम लागू नाही. स्वसंरक्षणाचा हक्क habeas corpus प्रत्येकाला आहे. निवास स्वातंत्र्यः-मालकाच्या परवानगीशिवाय त्याच्या घरांत शिरण्याचा हक्क कोणालाच नाही. दिवसा मात्र न्याय सत्तेला, आरोग्य रक्षक खात्यांतील लोकांनां व आदमिनिस्वादोरांनां, कायद्याची विशिष्ट बंधनें पाळून आत शिरतां येईल. विचार स्वातंत्र्यः-कोणतेहि विचार मनात बाळगणे हा गुन्हा होऊ शकत नाही. - उच्चार स्वातंत्र्यः-भाषण द्वारा किंवा लेखनद्वारा होणाऱ्या विचारप्रसाराला, आगाऊ परवानगीचे वगैरे कोणतेंच बंधन नाही. मात्र आपल्या रास्त हक्कांचें अतिक्रमण केल्यास न्यायासनासमोर त्याची चौकशी होईल. ह्या स्वातंत्र्याच्या विशेष अटी स्वतंत्र कायद्याने ठरविल्या जातील. मुद्रण स्वातंत्र्याच्या कायद्याची स्थित्यंतरें वृत्तपत्रांच्या वर्णनांत देण्यात येतील. भाषणस्वातंत्र्याची अट अशी आहे की, सभेची जागा व विषय, तालुक्याच्या गांवीं सभा भरावयाची असल्यास २४ तासांपूर्वी, व इतर गांवीं भरणाऱ्या सभेची ४८ तासांपूर्वी आदमिनिस्वादोर किंवा पोलिस अधिकाऱ्याला नोटिशीच्या द्वारे कळविले पाहिजे. आचार स्वातंत्र्यः-कायद्यांत विशेषे करून उल्लेखिलेल्या बाबींखेरीज केल्यास, अप्रिय असलेला धंदा करायला भाग पाडणे किंवा प्रिय असलेला धंदा करूं न देणे, हा गुन्हा समजला जाईल. मनसोक्त वागण्यास प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. मात्र तेणेकरून सरकारी धर्म, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक नीति व इतर व्यक्तींचे हितसंबंध यांनां बाध येऊ नये. -संस्थापन स्वातंत्र्याकार्त कोश्तितुसियोनाल या सनदेस अनुसरून केलेल्या रचनेच्या वाटेल त्या प्रकारच्या संस्था स्थापण्यास कोणतेंच बंधन नाही. - परिश्रम स्वातंत्र्यः—इतर व्यक्तींच्या हक्कांचे अतिक्रमण न करतां, उत्पन्न केलेल्या मालमत्तेवर, मग ती वाङ्मयात्मक असो, आर्थिक किंवा भूमिजनित असो उत्पादकाचा हक्क अबाधित आहे. तक्रार स्वातंत्र्यः-अनिष्ट वाटणारे कायदे मोडून किंवा त्याविरुद्ध तक्रार करून बदलून घेण्याचा हक्क प्रत्येक प्रजाजनास आहे. मात्र न्यायसनासमोर कायदेभंगाचा परिणाम भोगावा लागेल.