पान:गोमंतक परिचय.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ३८ त्याशिवाय गव्हर्नर कौसेर दा काइत यांनी जुन्या काविजादीत २४ शाळा स्थापन करण्याचे ठरविले. अर्थात् पोर्तुगीज शाळांची संख्या ३४ नी वाढली. शिक्षणक्रमांत मात्र मुळीच फरक झाला नाही. मला कायश द बेनेफिसेंसिय इश्कोलारः-इ. स. १९१७ साली प्रत्येक शाळेला जोडून वरील नांवाची एक नवी संस्था उघडण्यात आली. सद्गृहस्थांकडून मिळालेली मदत व मुलांकडून किंवा इतर सभासदांकडून आलेल्या वर्गण्यानी ही शाळेची लहानशी दीनसाहाय्यक संस्था चालते. गरीब मुलांना पुस्तके, पाटया, कपडे, व (शक्य तर ) जेवण देणे, शाळेतील मुलांना सहल करावयाला नेणे, शाळेची लायब्ररी चालविणे, मुलांच्या हस्तकामाचे प्रदर्शन के शाळेचा वार्षिक उत्सव साजरा करणे, इत्यादि कामें या संस्थेतर्फे होतात. वर्गणीदार दोन प्रकारचे आहेत. शाळेतील मुलें कायम सभासदवर्गाची असून त्यांना किमान वर्गणी मासिक अर्धा आणा व इतर सद्गृहस्थ साहाय्यक सभासदवर्गात मोडत असून, त्यांना किमान वर्गणी मासिक २ आणे ठरविली आहे. आदमिनिस्त्रादोर किंवा रॅजिदोर हा संस्थेचा अध्यक्ष असतो, व नियामकमंडळ सभासदांनी निवडावयाचे असते. मात्र उपाध्यक्षाची जागा शिक्षकांपैकी एकाला मिळावी असा कायदा आहे. ह्या सोयीमुळे एक्सकर्शनें बरीच सोपी होऊन दरसाल प्रत्येक शाळा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी मुलांना नेऊ शकते.

  • - प्रांतिक कायदेकौन्सिलची योजना:-इ. स. १९२० साली, गव्हनर ज्याइम द मोराइश यांनी प्रांतिक कायदेकौन्सिलांत एक महत्त्वाचे विल पास करून घेऊन पोर्तुगाल सरकारच्या समंतीसाठी पाठविले होते. ह्या बिलाने गोव्यांतील साऱ्याच शिक्षणांत सुधारणा होणार होती. परंतु पोर्तुगाल सरकारने हा कायदा पास केला नाही. मात्र प्राथमिक शिक्षणांत व नॉर्मल स्कुलांत त्यांतील हस्तकामाचा समावेश केला व डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ही जागा तेवढी भरून पाठविली. बाकी सुधारणा जशाच्या तशाच राहिल्या.

. १९१० पासून १९२० चा आढावाः-रिपब्लिक स्थापन झाल्यापासूनच्या था दहा वर्षांच्या कालावधीत प्राथमिक शिक्षणाची जी प्रगति झाली, तिचे सिंहा-- वलोकन केल्याशिवाय पुढे जाणे योग्य होणार नाही.