पान:गोमंतक परिचय.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय. प्रकरण ४ थें - सामाजिक परिस्थिति विभाग दुसरा हिंदुसमाज सामान्य वर्णन व प्रमख जाती:-गोमंतकीय हिंदू समाज सामान्यतः इतर ठिकाणच्या हिंदु समाजासारखाच आहे. त्यांतील प्रमुख प्रमुख जाती म्हणजे गौड सारस्वत ब्राह्मण, कन्हाड्यांतील पद्ये ब्राह्मण, चित्पावनब्राह्मणांची थोडीशी वस्ती व दैवज्ञ शिवाय वैश्य, मराठा, क्षत्रिय; भंडारी समाज, कुणबी, नापित, मराठा गायक इत्यादि होत. शिक्षणांत किंवा राजकीय बाबतींत सामान्य करून गौड सारस्वतब्राह्मणच पुढारलेले आहेत. गौड सारस्वतांत चारपांच पोटभेद आहेत; परंतु अलीकडे ते पूर्वीसारखे रोटीबंद नाहींत. गौड सारस्वतब्राह्मणांचे माध्वसंप्रदायी वैष्णव व अद्वैत मतानुयायी स्मार्त, असे दोन मुख्य भेद दिसन येतात. येथील गो. सा. ब्राह्मणांच्या व इतर देवस्थानांत व सार्वत्रिक, वैदिकी व पौरोहित्य चालविणारी घराणीं गौड व द्रविड या दोन्ही शाखेची आहेत. गौडांत शिक्षणसंपन्नता जास्त व षटकर्माधिकारांतील प्रतिग्रहाकडे ओढा कमी अर्थात् भिक्षुकहि कमी. गौड सारस्वतब्राह्मणांच्या खालोखाल शिक्षणांत किंवा इतर घडामोडींत पुढारलेला वर्ग म्हणजे वैश्यसमाजीय होय. मराठा समाजांत शिक्षणविषयक आकांक्षा नुकत्याच उत्पन्न होत असल्या, तरी हा वर्गहि राजकीय, सामाजिक वगैरे चळवळीत नुकताच पडू लागला असून आपल्या परिस्थितीच्या जाणिवेमुळे उन्नत्यर्थ बराच धडपडत आहे. भंडारी समाज, देवज्ञ ब्राह्मणसमाज, नापित समाज देखील आपली कित्येक शतकांची झोंप सोडून प्रगतिपथ झपाटयाने आक्रमण करीत असलेले दिसून येतात. परंतु निदान प्रस्तुत लेखकाला तरी या सर्व समाजांच्या चळवळीपेक्षां गोमंतकांतील मराठागायकसमाजांत जी तीव्र जागृति उत्पन्न झालेली दिसन येते, आपल्या दीर्घकालीन त्याज्य अशा परिस्थितीतून वर येण्याची त्यांची जी धडपड चाललेली आहे, तिचेच विशेष कौतुक वाटते. पुढारलेल्या गौड सारस्वतब्राह्मणवर्गात सामान्यतः स्पृश्यास्पृश्यतेच्या समजुती दक्षिणी द्रविडव्राह्मणांइतक्या तीव्रतेने दिसत नसल्यामुळे असो किंवा