पान:गोगलगाईचे पंख.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन वर्षाचा असताना माझ्या मुलानं विचारलं होतं, "तांबडं फुटलं म्हणजे काय?" त्या नंतर दहा वर्षांनी मी कविता लिहिली, म्हणजे मला सुचली 'सकाळ' ५ / १२ / १९९९ मध्ये ती प्रसिद्ध झाली. 'सांग ना आई तांबडं फुटलं म्हणजे काय? सूर्य उगवताना पहाट लाजते गाल तिचे होतात लालेलाल तिरक्या किरणांतून उगवतो गुलाल सृष्टी होते केसरीलाल' असं कधी कधी बीज पडतं आणि कधी रुजतं सांगता येत नाही. आपलं मन मात्र निखळ, सजग, असावं. निर्मितीच्यावेळी संवेदनशील निर्मिती होतेच सावित्री जगदाळे FACTS A लोकसंस्कृती प्रकाशन