पान:गोगलगाईचे पंख.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझे आजोबा आजोबांना द्यावा लागतो दोरा ओवून सुईच्या बारीक नाका मग शिवतात बटण गाठ मारून घालतात टाका आजोबांचे पाठांतर अजब अजून म्हणतात पाढे खाड्खाड् अभंगासोबत औटकी निमकीची परेड असते ताङ्ताङ् आजोबा आमचे विसरभोळे नावेही राहत नाहीत लक्षात ठमा यमा सकू ठकू म्हणतात बसा गं सगळ्या झोपाळ्यात आजोबा आमचे कानाला टोपी अंगावर पडशी गुंडाळून बसतात थरथरत्या हाताने कोपरीतच्या खिशातला खाऊ देतात 67