पान:गृह आरोग्य.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुस्तकाविषयी... वैशिष्ट्ये : १. प्रश्न, प्रयोगाच्या माध्यमातून काम. २. संबंधित विषयांचा (उदा. रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित) अंतर्भाव. ३. या विषयात असणारा संकेतमान्य स्त्री-पुरुष भेद तोडणारी प्रक्रिया. ४. आरोग्यविषयक कामात (उदा. रक्तगट, हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासणे.) केवळ कौशल्याधारित प्रक्रिया न ठेवता, मूलभूत विज्ञानाचा अंतर्भाव. कार्यक्रमाकडून असणाऱ्या अपेक्षा : १. हाताने काम करत शिक्षण घेणे. २. तंत्रज्ञानविषयक शिक्षण हे समाजाच्या गरजा, प्रश्न यांवर आधारित ठेवणे. ३. एखाद्या कामाची गरज, परिणाम, आखणी यांपासून ते खरेदी-विक्री, जमा-खर्च असे सर्व टप्पे शिक्षणात अंतर्भूत करणे. ४. शिक्षणात सामाजिक, आर्थिक अशा कोणत्याही भेदांना वाव न ठेवणे. ५. 'सर्वच विषय एकमेकांना जोडलेले असतात' या तत्त्वावर आधारित शिक्षण प्रक्रिया ठेवणे. ६. कोणताही विषय, कुठलीही संकल्पना सहज-सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत, पर्यायाने समाजापर्यंत पोहोचवणे. ७. मन, मनगट आणि मेंदू यांच्या विकास प्रक्रियेतल्या परस्पर संबंधानुसार शिक्षण प्रक्रियेची आखणी करणे. ८. कार्यक्रमाची आखणी करताना शाळा-समाज यांच्या भूमिका परस्परांना पूरक ठेवणे. ... ETTE भारतीय शिक्षण संस्था संचालित, विज्ञान आश्रम पाबळ. ता.शिरुर, जि.पुणे ४१२४०३. फोन : ०२१३८-२९२३२६ e-mail : vapabal@gmail.com, www.vigyan ashram.com, www.iiepune.org Samarth Media Center, Pune Ph-66027359, 22 Feb 2012