पान:गुन्हेगार जाती.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ पपकलिजावन पळ. भुय किंवा माकडे युरोपियन. गुन्हेगार जाती. टेंतो रजपूत अथवा गिराशिया. पेलौ, जेलवो परकी माणूस. वसू 'पैसे. ... ... ओहडे छे, येत आहे. चातरे छे कोल्ह्यांची हूक वाघरी हुबेहूब तोंडावाटें काढतात. असा आवाज जिकडून येईल तेथें टोळीचे लोक जमतात. उपजीविकेचीं बाह्य साधने:- चुनारिया चुना भाजतात आणि जमीन कसतात. अहमदाबादेत ते जुन्या विटा विकतात व बैलावर गोण्या वाहतात. ह्या जातीचे लोक गुन्हे करीत नाहींत. दातनिया दांतण विकतात आणि लग्नकार्यंत ढोल वाजवितात. ते कांकड्या, चिबड्या वगैरे भाजीपाला करतात, आणि तो त्यांच्या बायका विकतात. ते शिकारही करतात. वेड् शेती, व पावसाळ्यांत भाजीपाला करतात. ते बांबू व काठे- वाडी चिलमी विकतात, बरूंच्या तट्ट्या करतात आणि “ वळू " - टोणगे पाळतात. चुंवालिया भाजीपाला करतात, आणि बनावट मध विकतात. कंकोडिया शेती करतात, आणि मध व औषधीवनस्पति विकतात. ते शेळ्यामेंढ्याही पाळतात. चिकडिया अट्टल भिकार आहेत. आपल्याला कांहीं दुर्धर रोग झाला आहे, किंवा आपली कोणी बाई अडली आहे, अगर दुसऱ्या एखाद्या मोठ्या संकटांत आहोत, असा बाहणा करून ते भोळ्या लोकांकडून पैसा उकळतात. वाघऱ्यांचे आपण गुरु आहोंत अशी ते थाप मारतात. पटनी बैलांची हेड करतात, आणि वर्षानें पैसे घेण्याची बोली करून शेतकऱ्यांला ते विकतात. ते बैल खच्ची करण्याचाही धंदा करतात. तळब्दे शेती व जागलकी करतात. ते लांकडें फोडतात आणि शेळ्यामेंढ्या पाळतात. ते आंबे, मोहाची फुलें व फळें विकतात. पावसा- ळ्यांत ते व त्यांच्या बायका शेतमजुरी करतात. धांडरिये, ढोरें, भाजी- पाला, फळें व आंबे विकतात. ते बहुतेक गुन्हा करीत नाहींत. वाघरी शेतीला चिकटून राहत नाहींत. त्यांपैकी पुष्कळजण अहमदाबादसारख्या