पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवेश- २७ कसे करावें, हाच त्याचा मुख्य प्रश्न होता; आणि कितीहि लटपट केली तरी “निष्काम बुद्धीनें युद्ध कर” किंवा “कर्म कर” असें या प्रश्नाचे म्हणजे मुख्य मुद्दयाचेच जें उत्तर तें ‘अर्थवाद' म्हणून कधीहि उडवून टाकितां येत नाही. तसें करणें म्हणजे खुद्द यजमानास त्याच्याच घरांत पाहुणा ठरविण्यासारखें होय :वेदान्त, भक्ति किंवा पातंजल योग हो गोतंत मुदलांच उपदेशिलां नाहीत, असें आमचे म्हणणें नाही. परंतु या तीन विषयांची गोतंत जी जुळणी केलेली आहे ती अशी असली पाहिजे कीं, तिच्यामुळे परस्परविरुद्ध धर्माच्या भयंकर कचाटीत पडल्यानें “हें करूं का तें करूं” अशा रीतीन कर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनास आपल्या कर्तव्याची निष्पाप वाट सांपडून क्षात्रधर्माप्रमाणे आपले शास्रोक्त कर्म करण्यास त्याने प्रवृत्त व्हावें. तात्पर्य, प्रवृत्तिधर्मीबॆच ज्ञान या ठिकाणी प्रस्तुत असून बाकी गेोष्टी तात्सिद्धयर्थं म्हणजे आनुषंगिक असल्यामुळे गीताधर्माचे जें रहस्य तेंहि प्रवृतिपर म्हणजे कर्मपरच असले पाहिजे, हें उघड सिद्ध होतें. पण हें प्रवृत्तिपर रंहस्य कोणतें आणि तें नच कसें निष्पन्न होतें याचा नीट खुलासा कोणत्याहिं टीकाकारानें केलेला नाहीं. जेा पहावा ती गीतेचा उपक्रम म्हणजे पहिला अध्याय आणि शेवटचा उपसंहार व फल यांकडे दुर्लक्ष करून गीतेंतील श्रह्मज्ञान किंवा भक्ति आपआपल्या संप्रदायासच कशीं अनुकूल होतात, याचा निवृत्तिदृष्टया खल करण्यांत गढून गेलेला आहे. जणू काय ज्ञान व भक्ति यांचा कमीशीं नित्यसंबंध ठेवणें हें एक मोठे पापच होय ! आम्ही म्हणतों ती शंका एकास येऊन, श्रीकृष्णाचे स्वत:चे चरित्र डेोळ्यापुढे ठेवून भववद्गीतेचा अर्थ लाविला पाहिजे असें त्यानें लिहिलें आह;* व श्रीक्षेत्र काशी थेथील नुक्तेच समाधिस्थ झालेले प्रसिद्ध अद्वैती परमहंस श्रीकृष्णानंदस्वामी यांनीं ‘गीतार्थ-परामर्श' नांवाचा भगवद्गीतेवर जेा एक लहानसा संस्कृत निबंध लिहिला आहं त्यांत “तस्मात् गीता नाम ब्रह्मविद्यामूले नीतिशास्रम्” -म्हणून गीता म्हणजे ब्रह्मविद्येनें सिद्ध होणारें नीतिशास्र अर्थात् कर्तव्यधर्मशास्त्र होय,-असा स्पष्ट सिद्धान्त केला आहे.# जर्मन पंडित प्रेो. डायसेन यानें आपल्या “उपनिषदांतील तत्त्वज्ञान” या ग्रंथांत एके ठिकाणीं भगवद्गीतेसंबंधानें असेच उद्गार काढिले असून दुस-याहि कित्येक पाश्चात्य व पौर्वात्य गीतापरीक्षकांनी हेंच मत प्रद* या टोकाकाराचे नांव व त्याच्या टीकेंतील कांहीं वर्षापूर्वी एका सदग्र့ ့ ့ ့ ့ ို့ ႏို पण ते ႏိုင္ဆိုႏိုင္ငံႏို गेलें तें ႏိုင္တို डत नाही. सदर गृहस्थाचे नांवहि आमच्या स्मरण हा त्या गृहस्थांचे दृष्टीस ੰ 驚 # श्रीकृष्णानंदस्वामींचे श्रीगीतारहस्य, ,गीतार्थपरामर्श व गीतासारोद्धार असे या विषयावर चार लहान निबंध असूनते सर्व एकत्र करूंनराजकोट येथेछापलेले आहेत. वर दिलेलें वाक्य त्यांच्या गीतार्थपरामशीत आहे.