पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*く गीतारहस्य अथवा कमैयेाग. र्शित केलें आहे. तथापि यांपैकी कोणीहि समग्र गीताग्रंथाचे परीक्षण करून कर्मपर दृष्टीनें त्यांतील सर्व प्रतिपादनाची किंवा अध्यायांची जुळणी कशी लागत्ये, हें स्पष्टपणें खुलासवार दाखविण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट हें प्रतिपादन कष्टसाध्य आह, असें डायसेन थानं आपल्या ग्रंथांत म्हटले आहे. यासाठी तशा प्रकारचे गीतेचे परीक्षण करून त्यांतील संगति दाखविणें हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. परंतु तसें करण्यापूर्वी गीतेच्या प्रारंभीं परस्परविरुद्ध नीतिधमीच्या कचार्टीत सांपडून अर्जुनावर जें संकट आलें होतें त्याच्या स्वरूपाचा जास्त खुलासा करणें जरूर आहे. एरवीं गीतंतील विषयाचे मर्म वाचकांच्या पूर्ण लक्षांत यावयाचे नाही. म्हणून कमीकर्माच्या विर्वचनेचीं ही संकटें कशी असतात व अनेक प्रसंगीं “हें करूं का तें करूं” अशा घेोंटाळ्यांत पडून मनुष्य कसा गांगरून जातो, हें नीट समजण्यासाठी असल्या प्रसंगांचीं जीं अनेक उदाहरणें शास्रांत-विशेषतः महाभारतांतआढळून येतात त्यांचाच आतां प्रथमतः विचार करूं.

  • Pref. Deussen's Philosophy of th, Uranishads, ή 362, { English Translation, 1906.).