पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ गीतारहस्य अथवा कर्मयोग. उन्नतीला अनुकूल जें कर्म तं पुण्य, धर्म किंवा शुभकर्म, आणि त्याला प्रतिकूल जें कर्म तें पाप, अधर्म किंवा अशुभ असें आम्ही समजतों. कर्तव्य, कार्य, अकतैव्य, अकायै या शब्दांऐवजीं दुहेरी अर्थाचे--अतएव जरा संदिग्ध असले तरीधर्म आणि अधर्महेच शब्द प्रायः आम्ही उपयोगांत आणितों, यांतील मर्महि हेंच आह. बाह्य सृष्टींतील व्यावहारिक कर्म किंवा व्यापार यांचा विचार जरी मुख्यत्वें करून प्रस्तुत असला, तरी सदर कर्माच्या बाह्य परिणामाच्या विचाराबरोबरच हे व्यापार आत्म्याच्या कल्याणाला अनुकूल आहेत का प्रतिकूल आहत हा विचारहि आम्ही नेहमी करीत असतों. मी आपलें हित सेोडून लोकांचे हित कां करूं असा आधिभौतिकवाद्यास कोणी प्रश्न केला तर “हा सामान्यतः मनुष्यस्वभावच आहे” याखेरीज तो दुसरें काय समाधान सांगणार ? आमच्या शास्रकत्याँची दृष्टियापलीकडे पोंचलेली आहेः आणि त्या व्यापक आध्यात्मिक दृष्टीनेंच कर्मयेोगशास्राचा महाभारतांत विचार केलेला असून भगवद्गीतंत वेदान्ताचे निरूपणहि एवढ्याचसाठी केलेले आहे. मनुष्याचे ‘अत्यंत हित' किंवा 'सद्गुणाची पराकाष्ठा' यासारखें कांहीं तरी परम साध्य कल्पून मग त्या धोरणानें कर्माकर्मविवेचन केले पाहिजे असें प्राचीन ग्रीक पंडितांचेहि मत असून, आत्म्याच्या हितांतच या सर्व गोष्टींचा समावेश हेोते असें आरिस्टॉटल यानें आपल्या नीतिशास्रावरील ग्रंथांत म्हटलें आह (१.७,८). तथापि आत्म्याच्या हिताला या बाबतीत जितकें प्राधान्य दिलें पाहिजे तितकें आरिस्टॉटलनें दिलेलें नाहीं. आमच्या शास्रकारांची गोष्ट तशी नाहीं. आत्म्याचे कल्याण किंवा आध्यात्मिक पूर्णावस्थाहें प्रत्येक मनुष्याचे पहिलेंव परम साध्य होय, व इतर प्रकारच्या हितापेक्षां तेंच प्रधान मानून तदनुसार पुढे कर्माकमीचा विचार केला पाहिजे, आध्यात्मविद्येस सोडून कर्माकर्मविचार करणेंयुक्त नाहीं, असें त्यांनी ठरविले आहे; आणि अर्वाचीन कालीं पाश्चिमात्यदेशांतील कांहीं पंडितांनी कर्माकर्मविवेचनाची हीच पद्धतस्वीकारिली आहे असे दिसून येतें. उदाहरणार्थ, जर्मन तत्त्वज्ञानी कान्ट यानें प्रथम शुद्ध(व्यवसायात्मिक) बुद्धीची मीमांसा, हा अध्यात्मविषयक ग्रंथ लिहून मग त्याची पुरवणी म्हणून ‘व्यावहारिक (वासनात्मक)बुद्धीची मीमांसा' हा नीतिशास्राचा ग्रंथ लिहिला;* आणि इंग्लंडांतहि ग्रीन यानं आपल्या ‘नीतिशास्राच्या उपोद्घातास'सृष्टीच्याबुडाशी असणाच्या आत्मतत्त्वापासूनच सुरुवात केली आहे. परंतु या ग्रंथांऐवजी फक्त आधिभौतिक पंडितां

  • कान्टा हातत्त्वशानी जर्मनअसून याला अर्वाचीनतत्त्वज्ञानशास्राचा जनक समजतात. qsa Critique of Pure Reason (so soft stafar) ans. Critique of Pactical Acason _(बासनात्मक बुद्धीचीमीमांसा) असे दोन प्रसिद्ध ग्रंथ आहेत. sfērass=qrirafă ziją Poleg mena to Ethics asti affè.