पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२

गीतारहस्य अथवा कर्मयोग

विले आहेत. तथापि शास्त्रीय व गहन विषयांची चर्चा थोडक्या शब्दांनीं करणें नेहमींच कठिण असून, या विषयांची मराठी परिभाषाहि अद्याप कायम झालेली नाही; म्हणून भ्रमानें, नजरचुकीनें, किंवा अन्य कारणांनी, आमच्या या नवीन तऱ्हेच्या विवेचानांत काठिन्य, दुर्बोधता, अपुरेपणा किंवा दुसरे दोषहि रहाण्याचा संभव आहे हें आम्ही जाणून आहों. परंतु भगवद्गीता[टंकनभेद] वाचकांस अपरिचित आहे असे नाहीं. गीता पुष्कळांच्या नित्यपाठांतली असून तिचें शास्त्रीयदृष्ट्या अध्ययन केलेले व करणारेहि पुष्कळ लोक आहेत. यासाठीं अशा अधिकारी पुरुषांस आमची अशी विनंति आहे कीं, त्यांच्या हातांत हा ग्रंथ पडून त्यांत वरील प्रंकारचे कांही दोष त्यांचे नजरेस आल्यास त्यांनी ते मेहेरबानीनें आम्हांस कळवावे, म्हणजे त्यांचा विचार करून या ग्रंथाची द्वितीयावृत्ति काढण्याचा प्रसंग आल्यास त्यांत योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल. आमचा कांही विशिष्ट संप्रदाय असून तत्सिद्ध्यर्थ आम्ही गीतेचा एक प्रकारचा विशिष्ट अर्थ करितों अशी कित्येकांची समजूत होण्याचा संभव आहे. यासाठी येथें एवढें सांगितलें की, गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्याहि विशिष्ट व्यक्तीस किंवा संप्रदायास उद्देशून लिहिलेला नाहीं. आमच्या बुद्धीप्रमाणें गीतेच्या संस्कृत श्लोकाचा[टंकनभेद] जो सरळ अर्थ होतो तो आम्हीं दिला आहे. असा सरळ अर्थ केल्यानें, - आणि हल्ली संस्कृताचा बराच प्रसार झाला असल्यामुळें अर्थ सरळ आहे कीं नाहीं हे पुष्कळांस सहज कळण्यासारखें आहे, - त्यांत जर कांही सांप्रदायिकपणा येईल तर तो गीतेचा आहे, आमचा नव्हे. "मला दोनचार मार्ग सांगून घोटाळ्यांत न पाडितां, त्यांपैकी जो श्रेयस्कर असेल तो एकच निश्चयेकरून[टंकनभेद] सांगा" (गी.३.२;५.१) असा अर्जुनाचा भगवंतांस स्पष्ट प्रश्न असल्यामुळें, गीतेंत कांही तरी एकच विशिष्ट मत प्रतिपाद्य असलें पाहिजें हें उघड आहे (गी.३.३१); व तें कोणतें हे मूळ गीतेचाच अर्थ करून निराग्रहबुद्धीनें आम्हांस पहावयाचें आहे; प्रथम कांही तरी एकच विशिष्ट मत कायम करून, त्याला गीता जुळत नाहीं म्हणून गीतार्थाची ओढाताण करावयाची नाहीं. सारांश, गीतेचें खरोखरच जे रहस्य आहे, - मग तें कोणत्याहि संप्रदायाचें अगर पंथाचें असो, - त्याचा गीताभक्तांत प्रसार करून भगवंतानींच अखेर म्हटल्याप्रमाणें हा ज्ञानयज्ञ करण्यास आम्ही प्रवृत्त झालों आहों; व आम्हांस अशी उमेद आहे की, त्याच्या अव्यंगतासिद्ध्यर्थ[टंकनभेद] वर मागितलेली ज्ञानभिक्षा आमचे देशबंधू व धर्मबंधू आम्हांस मोठ्या आनंदाने घालतील.

प्राचीन टीकाकारांनी प्रतिपादिलेलें गीतेचें तात्पर्य आणि आमच्या मताप्रमाणें गीतेचें रहस्य यांत भेद कां पडतो याची कारणें गीतारहस्यांत सविस्तर सांगितलीं आहेत. परंतु गीता-तात्पार्यासंबंधानें जरी याप्रमाणें मतभेद असला तरी