पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग २-गीता व उपनिषदें w?". ठायीं भक्ति असेल-असें सूत्र प्रथम देऊन (पा. ४.३.९५), पुढे “वासुदेवार्जुनाभ्यां बुन्” (पा. ४.३.९८) या सूत्रानें वासुदेवाचे ठिकाणीं ज्याची भक्ति आहे त्यास ‘वासुदेवक' व अर्जुनाच्या ठिकाणीं ज्याची भक्ति असेल त्यास ‘अर्जुनक' म्हणावें अशी पाणिनीची सूत्रे असून, पतंजलीच्या महाभाष्यांत यावर टीका करितांना ‘वासुदेव' हें या सूत्रांत क्षत्रियाचे किंवा ‘भगवंतांचे' नांव आहे असे म्हटलें आहे. पैकीं पतंजलीचे भाष्य ख्रिस्ती सनापूर्वी सुमारें अडीचशें वर्षे झालेले आहे असें डॉ. भांडारकर यांनी सिद्ध केले असून पाणिनीचा काल यापेक्षांहि बराच प्राचीन असला पाहिजे याबद्दल वाद नाहीं. शिवाय बौद्ध धर्मग्रंथांतहि भक्तीचा उल्लेख असून बौद्ध धर्माच्या महायानपंथांत भक्तीचीं तत्त्वें शिरण्यास श्रीकृष्णाचा भागवतधर्मच कारण झाला असावा असे आम्ही पुढे सविस्तर दाखविले आहे. म्हणून निदानपक्षीं बुद्धाच्या पूर्वी म्हणजे अर्थातच खिस्ती सनाच्या पूर्वी सुमारें सहपक्षां अधिक शतकें आमच्याकडील भक्तिमार्ग पुरा स्थापित झालेला होता असें निर्विवाद सिद्ध होतें. नारदपंचरात्र किंवा शांडिल्याचीं अगर नारदाचीं भक्तिसूत्रे तदुत्तरकालीन आहेत. पण भक्तिमागीच्या किंवा भागवतधमच्यिा प्राचीनत्वास त्यानें कांहींच बाध येऊं शकत नाहीं. प्राचीन उपनिषदातून ज्या सगुणोपासना वर्णिल्या आहेत त्यांतूनच क्रमाक्रमानें आमचा भक्तिमार्गे निघालेला आहे, आणि पातंजल योगांत चित्त स्थिर होण्यास कांहीं तरी व्यक्त व प्रत्यक्ष वस्तु डेोळ्यापुढे ठेवावी लागत असल्यामुळे भक्तिमार्गाला त्यानें दुजेोरा भिळालला आहे, भक्तिमार्ग दुस-या कोठून हिंदुस्थानांत आलेला नाहीं व येण्याचे कारणहि नव्हतें, असें गीतारहस्यांतील विवेचनावरून उघड दिसून येईल. हिंदुस्थानांत अशा रीतीनें उद्भवलेल्या भक्तिमार्गाचे व विशेषतः वासुदेवभक्तीचें उपनिषदांतील वेदान्तदृष्टया समथैन करणे हा गीतेच्या प्रतिपादनांतली एक विशेष भाग आहे. परंतु याहिपेक्षां अधिक महत्त्वाचा गीतेचा भाग म्हटला म्हणजे कर्मयोगाशीं भक्तीचा व ब्रह्मज्ञानाची जोड घालून देणे हा होय. चातुर्वण्याचीं किंवा श्रौतयज्ञयागादि कर्मे उपनिषदांनी गौण मानिली असली तरी चित्तशुद्धीसाठी ती केलींच पाहिजेत, व चित्त शुद्ध झाल्यावरहि तां सोडून देणे योग्य नाहीं, असें कांहीं उपनिषत्कारांचे म्हणणें आहे. तथापि ब-याच उपनिषदांचा ओढा सामान्यतः कर्मसंन्यासाकडे आहे असे म्हटलें पाहिजे. “कुर्वन्नेवेह कर्माणि” अशीं ईशावास्योपनिषदाप्रमाणे दुसच्या कांहीं उपनिषदातूनहिं आमरणान्तकर्मकरीत रहाण्याबद्दलचीं विधानें आहेत; पण अध्यात्मज्ञान आणि सांसारिक कर्म यांमधील विरोध काढून टाकून प्राचीन कालापासून चालत आलेल्या या कर्मयोगाचे गीतेत जें संमथैन आहे तें दुस-या कोणत्याहि उपनिषदांत आढळून येत नाही. किंबहुना या