पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२६ गीतारहस्य अथवा कर्मयाग-परिशिष्ट बाबतींत गीतेचा सिद्धान्त ब-याच उपनिषत्कारांच्या सिद्धान्ताहुन भिन्न आहे असें म्हणण्यास हरकत नाही. गीतारहस्यप्रकरण ११ यांत या विषयाचा सविस्तर विचार केला असल्यामुळे येथे याबद्दल जास्त लिहून जागा अडवीत नाहीं गीतेच्या सहाव्या अध्यायांत ज्या योगसाधनाचा निर्देश आहे त्याचे पातैजल योगसूत्रांत सविस्तर व पद्धतशीर विवेचन असून, हींच सूत्रं या विषयावरील प्रमाणग्रंथ होत असें सध्यां समजतात. या सूत्राचे चार अध्याय आहेत. पैकी पहिल्या अध्यायाचें आरंभीच “योगश्चित्तवृत्तिनिरोधः” अशा योगाची व्याख्या देऊन “अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोध“”-हा निरोध अभ्यास व वैराग्य यांनी करितां येतो-असें सांगितल्यावर, पुढे यमनियमासनप्राणायामादि योगसाधनांचे वर्णन करून तिसच्या व चवथ्या अध्यायांत ‘अर्सप्रज्ञात' म्हणजे निर्विकल्प समाधीनें अणिमालधिमादि अलौकिक सिद्धि व सामथ्र्य कसें प्राप्त होतें, व या समाधीनेंच अखेर ब्रह्मनिर्वाणरूप मोक्ष कसा मिळतो, याचे निरूपण केले आहे. भगवद्गीतंतहेि प्रथम चित्तनिरोध करण्याची अवश्यकता (गी. ६.२०) व पुढे अभ्यास व वैराग्य या दोन साधनांनी चिताचा निरोध करावा (गी. ६.३५) हें सांगून शेवटी निर्विकल्प समाधि कशी लावावा व त्यांत सुख काय तें सांगितलें अहिं. पण तेवढ्यावरून पातंजल योगमार्ग भगवद्गीतस संमत आहे, किंवा पातंजल सूत्रे भगवद्गतिच्या पूर्वीचीं आहेत, असेंहि म्हणतां येत नाही. पातंजल सूत्रात वर्णन केल्याप्रमाणें समाधि सिद्ध होण्यासाठीं नाक धरून सर्व आयुष्य घालविण्यास भगवान् कोठेच सांगत नाहीत. कर्मयोगसिद्धयर्थ लागणारी बुद्धीची समता प्राप्त होण्यास साधन म्हणून गीतंत चित्तनिरोधाचे व समाधीचे वर्णन आलेले आह. म्हणून या बाबतीत पातंजलसूत्रांपेक्षां श्वेताश्वतर किंवा कठ या उपनिषदाशीं गीतेचे अधिक साम्य आहे असे म्हटलें पाहिजे. ध्यानबिंदु, छुरिका, योगतत्त्व हीं उपनिषदें योगावरचींच आहेत. पण त्यांत योग हाच मुख्य विषय असून त्याचीच महती सर्वत्र गाइली असल्यामुळे कर्मयोगच श्रेष्ठ मानणाच्या गीतेशीं या एकपक्षीय उपनिषदांचा सर्वाशीं मेळ घालणें युक्त नाहीं व तो बसतहि नाहीं. थामसन साहबांनी इंग्रजीत गीतेचे जें भाषांतर केले आहे त्याच्या उपोद्धातांत गीतंतील कर्मयोग पातंजल योगाचेच एक रूपांतर होय असें त्यांनी म्हटले आहे; पण ही गोष्ट मुळींच संभवनीय नसून गीतेतील ‘योग’ शब्दाचा खरा अर्थ लक्षांत न आल्यामुळे हे भ्रम उत्पन्न झालेले आहेत असें आमचे म्हणणे आहे कारण, गीतेंतील कर्मयोग प्रवृत्तिपर तर पातंजल योग त्याच्या अगदीं उलट म्हणजे निवृतिपर आहे. म्हणून यांपैकी एक दुसच्यापासून उद्भवला जाणे शक्य नाहीं व गीतेंत म्हटलेंहि नाही. किंबहुना योग या शब्दाचा जुना अर्थ कर्मयोग’ असा असून पातंजल