पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग २-गीता ध उपानेषदें ۹ نها भाग द-गीता व उपनिषदं. आतां गीता व निरनिराळीं उपनिषदें यांचा परस्पर संबंध काय आहे तो पाहूँ. हल्लींच्या महाभारतांतच जागोजाग उपनिषदाचा सामान्यरीत्या उल्लेख आोला आह इतकेंच नाही. तर बृहदारण्यक व छादोग्यामधील (बृ. १.३; छा, १२:) प्राणेंद्रियाच्या लढाईची हकीकत अनुगीतेंत (अश्व.२३) दिली असून “न मेस्तेनो जनपदे”इत्यादिकैकेय अश्वपतिराजाचे तोंडचे शब्द(छां.५.११.१५)शांतिपर्वात सदर राजाची गोष्ट सांगतांना आले आहेत (शां.७७.८).तसेंच “न प्रेत्य संज्ञास्ति”मल्यावर ज्ञात्याला संज्ञा रहात नाही; कारणु, तो ब्रह्मांत मिळून जातो-हा बृहदारण्यकांतील विषय (बृ.४.५.१३) शांतिपर्वात जनकपंचशिखसेंवादांत आला असून तेथेच अखेरीस प्रश्न व मुंडक या उपनिषदांताल (प्रश्न. ६. ५; मुं. ३.२.८) नदी आणि समुद्र यांचा दृष्टान्त नामरूपानें विमुक्त झालल्या पुरुषास उद्देशून योजिला आहे. शिवाय इंद्रियांना घोडे बनवून ब्राह्मणव्याधसंवादांत (वन. २२०) व अनुगीतेत बुद्धीला सारथ्याची जी उपमा दिली आहे, तीहि कठोपनिषदांतली असून (क. १. ३.३,) शीतिपर्वात (१८७.२९ व ३३१.४४) दोन ठिकाणीं “एष सर्वेषु भूतेषु गूढात्मा” (कठ.३.१२) व “अन्यत्र धमीदन्यत्राधर्मात्” (कठ. २.१४) हे कठोपनिषदांतील ?लोकहेि थोड्या फरवानें आले आहेत. श्वेताश्वतरांतील “सर्वतः पाणिपादं०” हा श्ठोक महाभारतांत अनेक ठिकाणा व गीतंतहि आला आहे हें पूर्वी सांगितलेच आहे. परंतु एवढयानेंच हें सादृश्य संपले नसून याखेरीज उपनिषदांतील पुष्कळ वाक्यें महाभारतांत ठिकठिकाणीं आला आहेत. किंबहुना, महाभारतातील अध्यात्मज्ञान बहुतक उपार्नषदांतलेंच आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. महाभारताप्रमाणेच भगवद्गीतंतील अध्यात्मज्ञानहिं उपनिषदांस धरून आहे. इतकेंच नव्ह, तर गीतेंतला भाक्तमार्गहि या ज्ञानाला न सेोडितां सांगितला आहे हें गीतारहस्याच्या नवव्या व तेराव्या प्रकरणांत आम्हीं सविस्तर दाखविलें आहे.म्हणून त्याची येथे द्विरुक्ति न करितां थोडक्यात एवढेच सांगतों कीं, गीतेच्या दुसच्या अध्यायांताल आत्म्याचें अशोच्यत्व,आटव्यांतील अक्षरत्रह्मस्वरूप आणि तेराव्यांतील क्षेत्रक्षेत्रज्ञविचार व त्यांतहेि विशेषेकरून ‘ज्ञेय' परब्रह्माचे स्वरूप, हे सर्व विषय अक्षरशः उपनिषदांच्याच आधार गीतेंत वर्णिले आहत. उपानषदांपैकीं कांही उपनिषदें गद्यांत व कांहीं पद्यांत आहेत. पैकीं गद्यात्मक उपनिषदांतील वाक्यें पद्यमय गीतेत जशींच्या तशींच येणे शक्य नाही; तथापि ‘जें आहे तें आहे आणि नाहीं तें नाहीं’ (गी.२.१६,) “यं यं वापि स्मरन् भावं०”(गी.८.६), ६त्यादि विचार छांदोग्योपनिषदांतले, आणि “क्षीणे पुण्ये०” (गी. ९.२१), ‘‘ज्योतिषां ज्योतिः” (गा.१३.१७), किंवा “मात्रास्पर्शाः” (गी.२.१४) इ०