पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२० गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट धरिला म्हणजे भारती युद्धाचे वर्णन ‘जय' नांवाच्या ग्रंथांत प्रथम असून, पुढे त्याच एतिहासिक ग्रंथांत उपाख्यानांची भर पडून, इतिहास आणि धर्माधर्मविवेधन या दोहोंचे निरूपण करणारा महाभारत हा मोठा ग्रंथ झाला असावा असे दिसून येतें. आश्वलायनगृह्यसूत्रांत “सुमन्तु-जैमिनी वैशंपायन-पैल-सूत्र-भाष्य-भारत-महाभारतधर्माचार्या.” (आ. गृ. ३.४.४) असा ऋषितर्पणांत भारत व महाभारत या दोन निरनिराळ्या ग्रंथांचा जो स्पष्ट उल्लेख आहे त्यावरूनहिं हेंच अनुमान दृढ होतें. लहान भारताचा याप्रमाणें मोठ्या भारतांत समावेश झाल्यावर कांहीं काळानें लहान भारत हा स्वतंत्र ग्रंथ शिल्लक न रहातां ‘महाभारत' हाच काय तो एक भारतग्रंथ अशी समजूत होणें स्वाभाविक आहे. हल्लींच्या महाभारताच्या प्रतींतहि व्यासांनी भारत प्रथमतः आपला पुत्र शुक यास आणि नंतर तें दुसच्या शिष्यांस पढावलें असें वर्णन असून, (आ. १.१०३) पुढे सुमंतु, जैमिनी, पैल, शुक आणि वैशंपायन या पांच शिष्यांनीं पांच निरनिराळ्या भारतसंहिता किंवा महाभारतें लिहिलीं असें स्पष्ट सांगितले आहे (आ.६३.९०). या पांच महाभारतांपैकीं वैशंपायनाचे महाभारत आणि जैमिनीच्या महाभारतापैकीं अश्वमेधपर्व एवढीच व्यासांनीं अखेर शिल्लक ठेविल अशी कथा आहे. ऋषितर्पणांत ‘भारत-महाभारत' या शब्दांपूर्वी सुमन्तु वगैरे नांवें कां आलीं याची आतां उपपति लागत्ये. परंतु इतक्या खोल पाण्यांत येथे शिरण्याचे कारण नाहीं. रा. ब. चिंतामणराव वैद्य यांनी आपल्या महाभारतावरील टीकाग्रंथांत या विषयाचा विचार करून जो सिद्धान्त केला आहे तोच आमच्या मतें सयुक्तिक आहे. म्हणून हल्लीं आपणांस उपलब्ध असललें महाभारत नसून भारताची किंवा महाभारताची अनेक रूपें होत होत अखेरीस त्याला जें स्वरूप आलें तें हल्लींचे महाभारत होय, एवढे या ठिकाणी सांगितलें म्हणजे बस्स आहे. यांपैकीं अगदीं मूळच्या भारतांतहि गीता नसेल असे म्हणतां येत नाहीं. सनत्सुजातीय, विदुरनीति, शुकानुप्रश्न, याज्ञवल्क्यजनकसंवाद, विष्णुसहस्रनाम, अनुगीता, नारायणीय धर्म वगैरे प्रकरणांप्रमाणेच हल्लींची गीताहि महाभारतकारांनीं पूर्वीच्या ग्रंथाच्या आधारानेंच लिहिली आह, नवी राचलेली नाहीं, हें उघड आहे. तथापि महाभारतकारांनीं अगदीं मूळच्या गीतेंत कांहींच फेरफार केला नसेल असेहि निश्चयाने सांगतां येत नाहीं. हल्लींची सातशें *लोकी गीता प्रस्तुतच्या महाभारताचाच एक भाग असून, दोहोंचीहि रचना एकाच्याच हातची आहे, हल्लींच्या महाभारतांत हल्लींची गीता कोणीं मागाहून ढकललेल नाहीं, एवढे वरील विवेचनावरून कोणाच्याहि सहज लक्षांत येईल. हल्लींच्या महाभारताचा काल कोणता, आणि मूळ गीतेबद्दल आमचे काय म्हणणे आहे तें पुढे सांगण्यांत येईल.