पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

oኣፃሪ गीतारहस्य अथवा कर्मयोग—परिशिष्ट ३११). सारांश, गीतंतल्या प्रसंगाला अनुसरून गीतेंत कांहीं विषयांचे विवेचन अधिक विस्तृत असून या विषयांची गीतेंतील जुळणी जरी निराळी असली, तरी गीतेंतील सर्व विचारांच्या तोडीचे विचार महाभारतांत पृथक् पृथक् इतरत्र कोठे ना कीठे तरी कमीजास्त प्रमाणानें आले आहेत असें आढळून येतें; आणि या विचारसाम्याबरोबर शब्दांचेहि थोडेंबहुत साम्य आपोआपच येतेंहें सांगावयास नको. मार्गशीर्ष महिन्यासंबंधाचे सादृश्य तर विलक्षणच आहे. गीतेंत “मासानां मार्गशीर्षोंऽहं” (गी १०.३५) असें या महिन्यास ज्याप्रमाणें प्रथम स्थान दिले आहे त्याप्रमाणेच अनुशासनपर्वोत दानधर्मप्रकरणी उपवासाकरितां महिन्यांची नांवें दोनदां सांगण्याचा जेथे प्रसंग आला तेथे प्रत्येक वेळी मार्गशीर्ष महिन्यापासून महिने मोजण्यास सुरुवात केलेली आहे (अनु.१०६व १०९). गीतेंतील आत्मौपम्याची किंवा सर्वभूतहिताची दृष्टि, अथवा आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक हा भेद, अगर देवयान व पितृयाण गति यांचाहि महाभारतांत इतरत्र अनेक ठिकाणीं उल्लेख आलेला आहे; पण याबद्दल मागील प्रकरणांतून सविस्तर विवेचन आले असल्यामुळे त्याची येथे पुनरुक्ति करीत नाहीं. भाषासादृश्य घ्या, अर्थसादृश्य ध्या,किंवा गीतेसंबंधानें महाभारतांत सहासातदां जे स्पष्ट उल्लेख आले आहेत त्यांचा विचार करा; गीता हा हल्लींच्या महाभारताचाच एक भाग असूच ज्या पुरुषानें हल्लींचे महाभारत रचिलें त्यानेंच हल्लींची गीता वर्णिलेली आहे, असें अनुमान करणे भाग पडतें. या सर्व प्रमाणांकडे दुर्लक्ष करून त्यांची कशी तरी वासलात लावून कांहीजणांनीं गीता प्रक्षिप्त ठरविण्याचा प्रयत्न केलेला आमच्या पहाण्यांत आलेला आहे. पण बाह्य प्रमाणास अप्रमाण ठरवून स्वत:च्या संशयापशाचिकेस अग्रस्थान देणा-या या लोकांची विचारसरणी आमच्या मतें अगदीं अशास्र अतएव अग्राह्य होय. त्यांतून गीता महाभारतांत कां यावी याची जर कांहीं उपपति'लागत नसती तर गोष्ट निराळी. पण या प्रकरणाच्या आरंभीं सांगितल्याप्रमाणे गीता नुस्ती वदान्तपर अगर भक्तिपर नसून प्रमाणभूत झालेल्या थोर पुरुषांचीं जॉ चरित्रे महाभारतांत वर्णिली आहत त्यांतील नीतितत्त्व किंवा मर्म सांगण्यासाठा महाभारतात कर्मयेोगपर गीता सांगणे जरूर होतें व ती हल्ली महाभारतांत ज्या स्थलों सांगितली आहे त्यापेक्षां काव्यदृष्टयाहि सर्व भारतग्रंथांत अधिक योग्य स्थल दिसत नाहीं एवढे सिद्ध झाल्यावर, गीता भारतांत योग्य कारणासाठीं व योग्य स्थलों आली आहे, प्राक्षप्त नव्हे, हाच सिद्धान्त अखेर कायम ठरतो. महाभारताप्रमाणेच रामायणहि सर्वमान्य व उत्कृष्ट आर्षे मृहाकाव्य असून त्यांत सुद्धां कथाप्रसंगानुसार सत्याचे, पुत्रधर्माचे, मातृधर्माचे, राजधमाझें वगैरे मार्मिक विवेचन केलेले आहे. पण हें काव्य महाभारताप्रमाणे