पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १-गीता व महाभारत ५१ ९ “ अनेकसमयान्वित, सूक्ष्म धर्माधर्माच्या अनेक न्यायांनी भरलेलें, आणि सर्व लोकांना शीलचारित्र्याचा सर्व प्रकारं धडा घालून देण्याला समर्थ” करण्याचा वाल्मीकिऋषींचा मूळ हेतु नसल्यामुळे, धर्माधर्माच्या, कार्याकार्याच्या अगर नीतीच्या दृष्टीनं महाभारताची योग्यता रामायणापेक्षां विशेष आहे, हें सागावयास नको. महाभारत हें नुस्तें आर्षे काव्य अगर नुस्ता इतिहास नसून धर्माधर्माच्या सूक्ष्म प्रसंगांचे निरूपण करणारी ही एक संहिताच आहे; आणि या धर्मसंहितेंत जर कर्मयोगाचे शास्रीय व तात्त्विक विवेचन आले नाही तर तें येणार कोठे ? नुस्त्या वेदान्तावरील ग्रंथांत हें विवेचन येऊं शकत नाहीं. धर्मसंहिता हेंच त्याचे योग्य स्थल होय; आणि महाभारतकारांनीं जर हें विवेचन केलें नसते तर धमाधमाचा हा मोठा संग्रह, किंवा पांचवा वेद, त्या मानानें अपुराच राहिला असता. ही अपूर्तता काढून टाकण्यासाठीं भगवद्गीता महाभारतांत आली आहे; आणि कर्मयोगसमर्थनाचें हें काम करण्यास वदान्तशास्राप्रमाणेच व्यवहारातहि अत्यंत प्रवीण असा महाभारतकारासारखा उत्तम ज्ञानी सत्पुरुष आम्हांस लाधला, हें अीमचे भाग्य समजले पाहिजे. t हल्लीची भगवद्गीता हा हल्लींच्या महाभारतांतच एक भाग आहें एवढे या प्रमाणें सिद्ध झाले, तरी त्याच्या अथीचा थोडा जास्त खुलासा केला पाहिजे. भारत आणि महाभारत हे दोन शब्द हल्लीं आपण समानार्थी समजतों; पण वस्तुतः हे दोन शब्द निराळे आहेत. व्याकरणरीत्या पाहिले तर भरतवंशातील राजाच्या पराक्रमाचे ज्या ग्रंथांन वर्णन आहे त्यास ‘भारत' असें नांव प्राप्त होतें. रामायण, भागवत इत्यादि शब्दांची व्युत्पति अशाच प्रकारची आहे; व त्याप्रमाणे भारती युद्धाचे ज्या ग्रंथांत वर्णन आहे त्यास नुस्तें ‘भारत' असे म्हटलें म्हणजे बस्स आहे; मग तो ग्रंथ कितीहि विस्तृत असला तरी हरकत नाहीं. रामायण ग्रथ कांहीं लहान नाहीं; पण त्यास महारामायण असें कोणी म्हणत नाहीं. मग भारतासच ‘महाभारत' हें नांव कां ? महत्त्व आणि भारतत्त्व या दोन गुणांमुळे ‘महाभारत’ हें नांव या ग्रंथास मिळालें असें महाभारताच्या शेवटीं सांगितले आहे (स्वर्गा. ५.४४). पण सरळ शब्दार्थ पाहिला तर ‘महाभारत' म्हणजे ‘मोठे भारत' असा अर्थ होतेो. आणि हा अर्थ घेतला म्हणजे ‘मोठे' भारत होण्यापूर्वी एखादें 'लहान’ भारत होतें काय ? आणि त्यात गीता होती कीं नाहीं ? अशी सहज शंका येत्ये. हल्लींच्या महाभारताच्या आदिपर्वात उपाख्यानांखेरीज महाभारतग्रंथ चोवीस हजार आहे असे वर्णन असून (आ. १.१०१), पुढे यासच ‘जय' असे पूर्वी नांव होतें असें म्हटलें आहे (आ. ६२.२०). ‘जय' या शब्दानें भारती युद्धांत §§§§ दिसतो; आणि तसा अर्थ