पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंह्लार ➢rv»ፃ आह की, त्याचे पूर्ण प्रतिपादन करण्यास एक निराळाच ग्रंथ लिहावा लागेल. तथापि तेवढ्यासाठी या ग्रंथांत हा विषय अजीबात गाळणेहि इष्ट नाहीं असें वाटल्यावरून दिग्दर्शनार्थ त्यांतील महत्त्वाच्या कांहीं गोष्टींचे या उपसंहारांत प्रथम विवेचन करितों. सदाचरण व दुराचरण, किंवा धर्म व अधर्म, हे शब्द खरें म्हटलें म्हणजे ज्ञानवान् मनुष्याच्या कर्मासच लागत असल्यामुळे नीतिमता नुस्त्या जड कर्मात नसून बुद्धीत आहे असें थोड्या विचाराओंतीं कोणाच्याहि लक्षांत येईल.“धमों हेि तेषामधिकेो विशेषः”-धर्माधर्मज्ञान हा मनुष्याचा म्हणजे बुद्धिमान् प्राण्याचाच विाशेष्ट गुण आह,-या वचनाचे तात्पर्य किंवा भावार्थहिं असाच आहे. एखादा बैल किंवा नदी खोडकर किंवा भयंकर आहे, असें त्यांच्था कर्माचा आपणावर जो परिणाम घडतो त्यावरून आपण म्हणतों खरं; पण बैलानें धक्का दिला तर त्यावर कोणी फियाद करीत नाही, आणि नदीला पूर येऊन पिकें वाहून गेल्यास ‘पुष्कळांचे पुष्कळ नुकसान” झाल्यामुळे कोणी तिला दुराचरणी किंवा लुटारूहि म्हणत नाहीं. यावर कित्येक असा प्रश्न करितात कीं, धर्माधर्माचे नियम मनुष्याच्या व्यवहारांसच लागतात हें एकदांकबूल केल्यावर, मनुष्याच्या कमीच्या बरेवाईटपणाचा जो विचार करावयाचा तो केवळ त्याच्या कर्मावरूनच करण्यास हरकत काय ? परंतु याहि प्रश्नाचे उत्तर देणें कांहीं कठिण नाही. कारण अचेतन वस्तु किंवा पशुपक्ष्यादि मूढ योनींतील प्राणी यांची गोष्ट सोडून मनुष्याच्याच कृत्यांचा विचार केला तरी त्यांतहि वेडेपणानें किंवा अजाणतां एखाद्याच्या हातून कांहीं अपराध घडल्यास लोकांत व कायद्यांत ज्या अर्थी तो क्षम्य मानिला जातो त्या अथ मनुष्याच्याहि कर्माकमाँचा बरेवाईटपणा ठरविण्यास कत्यांच्या बुद्धीचा, म्हणजे त्यानें कोणत्या हेतूनें तें कर्म केले व सदर कर्माच्या परिणामाचे त्यास ज्ञान होतें कीं नाहीं याचाच आधीं अवश्य विचार करावा लागतो. एखाद्या श्रीमंत गृहस्थास आपल्या खुषीप्रमाणे पुष्कळ दानधर्म करणें कांहीं कठिण नसतें. पण ही गोष्ट जरी ‘चांगली’ असली तरी त्याची खरी नैतिक किंमत जेव्हां ठरवावयाची असत्ये तेव्हां केवळ सहजगत्या केलेल्या या दानावरूनच ती ठरवितां येत नाहीं. या श्रीमंत गृहस्थाची बुद्धि खरोखर श्रद्धायुक्त आहे कीं नाहीं हें पहावें लागतं; आणि त्याचा निर्णय करण्यास सहजगत्या केलेल्या या दानाखेरीज जर दुसरा कांहीं पुरावा नसेल तर या दानाचा योग्यता श्रद्धापूर्वक केलल्या दानाबरोबर आहे असें कोणी समजत नाहीं; निदान शंका घेण्यास तरी योग्य कारण असतं. सर्व धर्माधर्माचे विवेचन झाल्यावर महाभारतांत अखेर हा अर्थ एका कथानकांत सुंदर रीतीनें वर्णिला आहे. युधिष्ठिर राज्याख्ढ झाल्यावर त्यानं जो योठा अश्वमेध यज्ञ केला त्यांत अन्नर्स