पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

|f \ు गीतारहरुय अथवा कर्मयोग कर्मयोग हे दोन्ही मार्ग आमच्याकडे वैदिक कालापासून प्रचलित असून संन्यासमार्गौतील लोकांपेक्षां केव्हांहि झाले तरी कर्मयोगमार्गाच्याच अनुयायांची संख्यासहृस्रपटू आधिक असून पुराणतिहासांतून ज्या कत्र्या महापुरुषांची वर्णनें येतात ते सर्व कर्मयोगमार्गाचेच पुरस्कर्ते होते. मग यांपैकी एकासदेखील आपल्या कर्मयोगमागांचे समर्थन करण्याची बुद्धि झाली नसेल काय ? सर्व ज्ञान ब्राह्मणज्ञातीत, आणि वेदान्ती ब्राह्मण कर्माबद्दल उदासीन असल्यामुळे कर्मयोगावर ग्रंथ झाले नाहीत, असें कारण कोणी दाखवील तर तेंहि सयुक्तिक नाही. कारण उपनिषत्कालीं व त्यानंतर जनक-श्रीकृष्णासारखे क्षत्रियांतहि ज्ञानी पुरुष झाले होते; आणि व्यासासारख्या बुद्धिमान् ब्राह्मणांनीं थोर थोर क्षत्रियांचा इतिहासहि लिहिलेला आहे. हा इतिहास लिहितांना ज्या थोर पुरुषांचा आपण इतिहास लिहितों त्यांच्या चरित्रांतील मर्म काय हेंहि सांगावयास नको काय ? हें मर्म म्हणजेच कर्मयोग किंवा व्यवहारशास्र; आणि तें सांगण्यासाठीच महाभारतांत जागोजाग सूक्ष्म धर्माधर्माचे विवेचन करून अखेर जगाच्या धारणपोषणाला कारणीभूत झालेल्या सदाचाराच्या म्हणजे धर्मीच्या मूलतत्त्वांचा मोक्षदृष्टि न सोडितां गीतेंत ऊहापोह केलेला आहे. इतर पुराणांतूनहि असें पुष्कळ प्रसंग आहेत. पण गीतेच्या तेजापुढे इतर सर्व विवेचनें फिक्क पडत असल्यामुळे भगवद्गीता हाच कर्मयोगशास्रावरील प्रधान ग्रंथ होऊन बसला आह. या कर्मयोगाचे खरें स्वरूप काय याचे मागील प्रकरणांतून आम्हीं सविस्तर विवेचन केले आहे. तथापि गीतेंत वार्णलेल्या कमीकर्माच्या आध्यात्मिक मृलतत्त्वांशीं पाश्चिमात्य पंडितांनीं प्रतिपादिलेलीं नीतीची मूलतत्त्वें कितपत जुळतातं याची तुलना केल्याखेरीज गीताधर्माचे हें निरूपण पूर्ण झाले असें म्हणतां यत नाही. ही तुलना करितांना दोहोंकडील अध्यात्मज्ञानाचीहि तुलना करावयास पाहिजे. पण पाश्चिमात्म आध्यात्मिक ज्ञानाची धांव आमच्या वेदान्तापलीकडे अद्याप फारशी गेलेली नाही. ही गेोष्ट सर्वमान्य असल्यामुळे,पौर्वात्य व पाश्चिमात्य अध्यात्मशास्रांची तुलना करण्याचे विशेष कारण रहात नसून ज्या शास्राची उपपात आमच्या प्राचीन शास्रकारांनी सांगितलेली नाहीं अशी कित्येकांची समजूत झालेली आहे त्या नीतिशास्राच्या किंवा कर्मयोगाच्या तुलनचाच प्रश्न काय तो शिल्लक रहातेो. पण या एकट्या विषयाचाहि विचार इतका विस्तृत *वेदान्त आणि पाश्चात्य तत्वशानू यांची तुलना प्रो. डायसन यांच्या 7Ae 4Ae”enArg/AMeta/*Aysrc* या ग्रंथांत ठिकठिकाणी केली असून या ग्रंथाच्या दुसन्या आवृif an arêx"On the Philosophy of Vedanta' onfäggravaazgo aff प्रा.डायसन हिंदुस्थानांत आले हाते तेव्हा त्यांनी मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीपुढे ši sqt sqfa fiš Řf Giffèě srst, qmfpara 7he Religton and Philosophy of tée CAaass/ads हा डायसनसाहेबांचा ग्रंथहि या बाबतीत वाचण्यासारखा आहे.