पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ५-हल्लींच्या गीतेचा काल ५६३ इतिहासांत एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. बौद्ध धर्माचे जुने ग्रंथ पाहिले तर जो भिक्षु पूर्ण अर्हतावस्थेस पोचला त्यानें कांहीं न करितां गेंड्याप्रमाणें रानांत रहावें असें सुत्तनिपातापैकीं खग्गविसाणसुतांत म्हटले असून महावग्गांत (५.१.२७) खास बुद्धाचा शिष्य सोनकेोलीविस याच्या गोष्टीत “जो भिक्षु निर्वाणपदास पोचला त्याला ‘कतस्स पटिचयो नत्थि करणीयं न विजति'-कांहीं करावयाचे शिल्लक उरलेले नसतें आणि केलेलें कांहीं भोगावयाचेंहि नसतें,” असे म्हटलें आहे. हा शुद्ध संन्यासमार्ग झाला; व त्याचे आमच्या औपनिषदिक संन्यासमार्गाशीं पूर्ण साम्य आहे. “करणीयं न विजति”हें वाक्य “तस्य कार्यं न विद्यते” या गीतावाक्याशीं समानार्थकच नव्हे, तर शब्दश:हि एकच आहे. पण बौद्ध भिक्षूंचा मूळचा हा संन्यासपर आचार बदलून पुढे ते जेव्हां परोपकाराची कामें करूं लागले तेव्हां जुन्या व नव्या मतांचा तंटा होऊन जुने लोक आपणांस ‘थेरवाद’ (वृद्धपंथ) म्हणू लागले; आणि नवे लोक आपल्या पंथास ‘महायान’ हें नांव देऊन जुन्या पंथास ‘हीनयान’ (म्हणजे कमी पंथाचे) म्हणू लागले. अश्वघोष हा महायानपंथाचा असून बौद्ध यतींनीं परोपकाराचीं.कामें करावीं हें मत त्यास ग्राह्य होतें. म्हणून सौदरानंद काव्याच्या अखेर नंद अर्हतावस्थेस पोंचल्यावर त्याला बुद्धानें या काव्यांत जो बोध केला आहे त्यांत प्रथमअवाप्तकार्योऽसि परां गतैि गतः न तेऽस्ति किंचित्करण्यमण्वपि । “ तुझें कार्य झालें, उत्तम गति तुला मिळाली, आतां तुझें (स्वतःचे) तिळभर देखील कर्तव्य उरलं नाहीं,” (सौ.१८.५४) असें सांगून पुढे विह्ाय तस्माद्विहृ कायैमात्मनः कुरु स्थिरात्मन्परकायेमप्यथेो 1।। “म्हणून तूं आपलेकार्थसोडून स्थिरबुद्धि होत्साता परकार्थ कर,” (सौ.१८.५७)असा स्वच्छ उपदेश केलेला आहे. बुद्धानें प्राचीन ग्रंथांतून केलेला कर्मत्यागपर उपदेश, आणि सौंदरानंद काव्यांत अश्वघोषानें बुद्धाच्या तोंडीं घातलेला हा कर्मयोगपर उपदेश, हे दोन्ही अत्यंत भिन्न आहेत; आणि अश्वघोषाच्या या कोटिक्रमाचे गीतेच्या तिसच्या अध्यायांतील“तस्य कार्यं न विद्यते...तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर”-तुझें कांहीं उरलें नाहीं, म्हणून प्राप्त झालेलें कर्तव्य निष्काम बुद्धीनें कर (गी.३.१७,१९)-या कोटिक्रमाशीं अर्थदृष्टयाच नव्हे, तर शब्दशःहि साम्य आहे असे दिसून येते. यावरून अश्वघोषानें ही कोटि गीतंतूनच घेतली आहे असे अनुमान होतें. कारण अश्वघोषापूर्वी महाभारत होतें हें वर दाखविलें आहे. पण ही गोष्ट केवळ अनुमानावरच अवलंबून आहे असें नाहीं. बौद्धांच्या पहिल्या संन्यासमार्गात महायानपैथानं जी ही सुधारणा केली ती महायानपंथाचा प्रमुख पुरस्कर्ता जो नागार्जुन त्याचा गुरु राहुलभद्र यास प्रथम सुचण्यास ‘ज्ञानी