पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ ६४ गीतारहरूय अंर्थवा कर्मयोग-परिशिष्ट श्रीकृष्ण व गणेश’ कारण झाले असें तारांनाथ नामक बौद्धधर्मीयाचा बौद्ध धर्माच्या इतिहासावर तिबेटी भाषेत जो ग्रंथ आहे त्यांत लिहिले आह. हा ग्रंथ रशियनमधून जर्मन भाषेत भाषान्तर झालेला आहे, इंग्रजीत नाहीं. आम्हीं त्याचा उतारा डा. केर्न यानें १८९६ सालीं बुद्धधर्माचें जें एक पुस्तक लिहिलें त्यावरून घेतला आहे.*या ठिकाणीं श्रीकृष्ण या नांवानें भगवद्गीतेचाच उल्लेख आहे असें डा. केर्न याचेहि मत आहे. महायानपंथाच्या बौद्ध ग्रंथांपैकीं ‘सद्धर्मपुंडरीक' नांवाच्या ग्रंथांतहि भगवद्गीतंतील श्रलेोकांसारखे कांहीं श्वठोक आहेत. पण या व इतर गोष्टींचा विचार पुढील भागांत करण्यांत येईल. मूळ बौद्ध धर्म संन्यासपर असतां त्यांत भक्तिपर व कर्मपर असा महायानपंथ निघण्यास भगवद्गीता कारण झालेली आहे असें खुद्द बौद्ध ग्रंथकाराचेच म्हणणें असून अश्वघोषाच्या काव्यांतलें आणि गीतंतलें वर जें साम्य दाखविलें आहे त्यावरूनहि त्याला बळकटी थत्ये एवढेच येथे सांगावयाचे आहे. महायानपंथाचा प्रथम पुरस्कर्ता नागार्जुन शकापूर्वी सुमारें शेंदीडशें वर्ष झाला असावा असें पाश्चिमात्य पंडितांनी ठरविलें असून, या पंथाचे बीजारोपण अशोकाच्या कारकीर्दीत झाले असले पाहिजे.हें उघड आहे. अथौद् भगवद्गीता महायन बौद्धपंथ निघण्यापूर्वी-किंबहुना अशोकाच्याहि पूर्वी--म्हणजे सुमारें इ. स. पूर्वी निदान तीन शतकें तरी अस्तित्वांत होती असें बौद्धग्रंथांवरून व खुद्द बौद्ध ग्रंथकारांनी लिहिलेल्या बौद्ध धर्माच्या इतिहासावरून स्वतंत्ररीत्या पुरें सिद्ध होतें. वरील सर्व प्रमाणांचा विचार केला म्हणजे हल्लींची भगवद्गीता शकापूर्वी सुमारें पांचशे वर्षे अस्तित्वांत होती याबद्दल बिलकुल शंका रहात नाहीं. डॅी. भांडारकर, कै. तेलंग, रा. ब. चिंतामणराव वैद्य आणि कै. दीक्षित यांचे मत बहुतेकांशीं असेंच आहे व तेंच या प्रकरणीं ग्राह्य मानिले पाहिजे. प्रो. गार्ब यांचे मतनिराळे असून त्याला आधार म्हणून गीतेच्या चवथ्या अध्यायांतील संप्रदायपरंपरेच्या लोकांमधील ‘योगो नष्टः’-म्हणजे योगाचा नाश झाला-हें वाक्य घेऊन त्यानें तेथे योग शब्दाचा अर्थ ‘पातंजल योग’ असा केला आहे. पण योग शब्दाचा अर्थ तेथे ‘पातंजल योग' असा नसून ‘कर्मयोग’ असा आहे हें आम्हीं पूर्वीच सप्रमाण दाखविले आहे. म्हणून प्रेो. गाबें यांचे मत चुकीचे व अग्राह्यहोय. हल्लीच्या गीतेचा कालशककालापूर्वी पांचशें वर्षापेक्षां अलीकडे ओढितां येत नाहीं हें निर्विवाद आहे. मूळ गीता यापेक्षांहि कांहीं शतकें तरी प्राचीन असली पाहिजे हें मागच्या भागांतच सांगितले आहे.

  • See Dr. Kern's Manual of Indian Buddhism, Grundriss, tII. 8. p. 122 महायानपंथाचा : ’ या नांवाचा मुख्य ग्रंथ चिनी भाषेत इ. स. १४८ च्या सुमारास भाषांतर झालेला आहे.