पान:गाव झिजत आहे.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणत्या धुरीणांनी याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. रांजणीच्या नॅचरल शुगर कारख्यान्याचे चेअरमन श्री. ठोंबरे यांनी त्यांच्या कारखान्यात वृद्धांसाठी सुरू केलेली प्रथा वाखाणण्यासारखी आहे. कारखान्यात नोकरीवर घेतानाच ते कर्मचाऱ्यांवर काहीअटी घालतात. त्याप्रमाणे त्या कर्मचाऱ्याला त्याच्या पगारातला काही हिस्सा आपल्याआई-वडिलांकडे पाठवावा लागतो. श्री. ठोंबरे यांच्या माणुसकीमुळे त्यांच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे आई-वडील सुख उपभोगीत आहेत. शासनाने ही पद्धतअवलंबिली तर अनेक वृद्धांना सुखाने जगता येईल.  असे ऐकिवात आहे की, जर्मनीमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीची पत्नी 'गृहिणी'असेल तर तिच्या कामाचा मोबदला तिच्या नोकरी करणाऱ्या पतीला वेतनाबोबरमिळतो आणि ते पैसे पती आपल्या पत्नीला घरी देतो. आपल्याकडे वेगळ्या अर्थाने हीयोजना राबविणे शक्य आहे. सध्या अनाथ वृद्धांना महिन्याकाठी २५० ते ३५० रुपयेकेंद्र आणि राज्य शासन देते. आज मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील मंडळी विविध क्षेत्रांत छोट्या-मोठ्या नोकऱ्या करीत आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते गाव सोडतात.यामुळे ते कुटुंब विभक्त होते आणि घरातील वृद्धांकडे दुर्लक्ष होते. वृद्धांना गावातचसोडून त्यांना नोकरीच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे वृद्ध गावातच दुर्दैवी जीवनजगत असतात. पगारातील काही हिस्सा आई-वडिलांना दिलाच पाहिजे असे बंधन जरशासनाने, निरनिराळ्या कंपन्या किंवा संस्थांना घातले तर ग्रमीण भागातील वृद्धांना नवजीवन मिळेल. पण ज्यांना कमी पगार मिळतो अशांच्या वृद्ध आई-वडिलांनासांभाळू न शकणाऱ्यांना पळवाट काढता येणार नाही. घरातील वृद्ध माणसे नोकरीकरणाऱ्या मुलाच्या घरात राहतील किं मुलगा त्यांना गावी पैसे पाठवील. एकत्रकुटुंबपद्धतीचा भाग म्हणूनच असा उपक्रम हाती घेणे योग्यच ठरेल. त्यामुळे वृद्धांचीकाळजी शासकीय कर्तव्य म्हणून पगारदारांना घ्यावीच लागेल, एकत्र कुटुंब पद्धती टिकविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, आजोबा-आजी व नातवंडांचे अजोड नातेकुटुंबाची शोभावाढवील. कुटुंबात सुख नांदेल. कुटुंब सुखी तर गाव सुखी असे दृष्य दिसेल. ७६ / गाव झिजत आहे