पान:गाव झिजत आहे.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १८. नारी के सहयोग बिना हर गाव सूना है गावविकासाच्या विविध समस्यांचा विचार करताना ग्रामीण भागातीलमहिलांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजकारणात ३३ टक्के आरक्षणमहिलांना मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला खुर्चीत बसायला शिकल्या.कोणी ग्रामपंचायत सदस्या झाल्या तर कोणी सरपंच. परंतु हे पदाचे आरक्षण महिलांच्यासंपूर्ण संरक्षणाचे साधन बनू शकले नाही. पूर्वीच्या काळी महिलांबद्दल आदर आणिसद्भाव दर्शविला जात होता. काही ऋषींनी तर महिलांबद्दल म्हटले आहे “यत्र नार्यस्तुपूज्यन्ते. रमन्ते तत्र देवता". म्हणजे जेथे महिलांचे पूजन होते तेथे देवताही रमतात.महिलांचा महिमा पुराणांतून वर्णन केला आहे! पण उत्तरोत्तर हा महिमा संपतो आहे.  महिला सबलीकरणाच्या आम्ही कितीही बाता मारल्या आणि योजनाराबविल्या तरीही महिलांवरील अन्याय, अत्याचार कमी होताना दिसत नाहीत.महिलांमध्ये आई, बहीण, पत्नी, मुलगी, नात यांचे दर्शन होते असे विद्वान सांगतात.उत्तरोत्तर हा सर्व दर्शनभाव कमी होतो आहे आणि शिल्लक राहत आहे ती फक्त 'नारी',नराने उपभोगण्याची वस्तू! स्त्री जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन विकृत होत चालला आहे.मुलीला मुलापेक्षा कुटुंबात कमी लेखले जाते. पालकांना मुलीचा जन्म नकोच असतो. खेड्यात तर 'वंशाचा दिवा' म्हणजे मुलगाच पाहिजे असतो. वंशाला पणती म्हणजेमुलगी चालत नाही. अशा धारणेमुळे मुलींचे जन्माचे प्रमाण घटत आहे. २००१ च्याजनगणनेचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की ठाणे, पुणे, सातारा, सांगली,सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात मुलींचे प्रमाणघटले आहे. मुलींचे घटण्याचे हे प्रमाण ग्रामीण भागात प्रत्येक दशकात वाढत आहे. नारी के सहयोग बिना हर गाव सुना है / ७७