पान:गाव झिजत आहे.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७. एकत्र कुटुंब-सुखी कुटुंब

-खेड्यातील शेजारधर्म अधुनिकतेच्या वावटळीमुळे संपुष्टात येत आहे. तसेपत्नी आणि त्यांची मुले अशी व्याख्या आजच्या काळात सर्वांनाच मान्य दिसते, पणग्रामीण कुटुंबाचे स्वरूप काही वेगळेच होते. कुटुंबात आई-वडील, भावंडे, आजी-आजोबा, नातवंडे-पतवंडे या सर्वांना स्थान होते. घरातील माणसांची जादा संख्या हेकुटुंबाचे वैभव होते. वडील आणि मुलगा यांच्यमध्ये जेवढा जिव्हाळा असे त्यापेक्षाकितीतरी अधिक जिव्हाळा आजी-आजोबा आणि नातवंडांच्या नात्यात होता.घरातील अशा वृद्धांच्या मदतीला नातू-पणतू धावून जात. आजी-आजोबा नातूपणतूंचे लाड पुरवीत आणि नातू-पणतू आजोबा-आजीची छोटी-मोठी कामे करीतअसत, मला आठवतं, २० वर्षांपूर्वी मानवलोकने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरअंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने घेतलेहोते. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना पाच-सहा दिवस रुग्णालयातच राहावे लागे.औषधपाण्याची काळजी डॉक्टर्स आणि परिचारिका घेत. परंतु इतर काळजीसाठीघरातले कोणीतरी रुग्णाजवळ असणे गरजेचे होते. त्या शिबिरात १००-१२५ रुग्णांवरशस्त्रक्रिया झाल्या. सर्व रुग्ण ६०-६५ वयाचे आणि ग्रामीण भागातले. रुग्णांचे नातेवाईक म्हणून बहुसंख्य रुग्णांजवळ काळजी घेण्यासाठी ८-१० वर्षांची नातवंडेहोती. मुला-मुलींपेक्षाही आजी-आजोबांना नातवंडांचा लळा जास्त असतो हे मलात्यावेळी जाणवले. आज हे दृष्य जरी काही कुटुंबांतून दिसत असले तरी येणाऱ्या काहीकाळात नातवंडे आणि आजोबांनी भरलेले घर दिसेल की नाही याची शंका आहे. एकत्र कुटुंब-सुखी कुटुंब / ७३