पान:गाव झिजत आहे.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहिजे. गावागावातून रुफ वॉटर हार्वेस्टिंग सारखे घराच्या छतावर पडणारे पाणीगावातील विहिरीत किंवा बोअरमध्ये साठविले पाहिजे. दुष्काळी भागातील साखरकारखाने बंद करून ते इतरत्र हालविले तर त्या भागातील पाणी इतर पिकांकडे वळविलेजाईल. पिण्याच्या पाण्याची कदापिही टंचाई भासणार नाही. पाणी ही सर्व प्राणिमात्रांचीअत्यावश्यक गरज आहे. ती वरील प्रकारच्या उपायांनी सोडविता येईल.

दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने पाण्याविषयी नवे धोरण ठरविले होते. त्यातउद्योगधंद्यासाठी पाणी देण्याचा क्रमांक दुसरा आहे. शेतीसाठी पाण्याचा क्रमांक तिसराआहे हे चूक आहे. भारतात शेती उद्योगच मोठा आहे. त्याला दुसऱ्या क्रमांकावर ठेवलेपाहिजे. महाराष्ट्र शासनाने देखील आपली जलनीती ठरवताना अशी चूक केली होती.नंतर ती दुरुस्त करून शेतीच्या पाण्याची गरज दुसऱ्या क्रमांकावर आणली हे बरे झाले.पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून पाणी सोसायट्या करण्यावर त्या धोरणात भरदिला आहे. त्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी झाली तर छोट्या शेतकऱ्यांनादेखील सिंचनासाठी पाणी मिळू शकेल. पाणी ऊसाकडून इतर पिकांकडे वळविले तरअन्नधान्य उत्पादनात वाढ होईल आणि पिण्याच्या पाण्याचा दुष्काळही संपेल. दुसऱ्याशेतकऱ्यांचा फायदा आहे.0बोअरचे पाणी पिण्यासाठी-पावसाचे पाणी शेतीसाठी/६१