पान:गाव झिजत आहे.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३. एक कुटुंब-एक उत्पन्नाचे साधन

मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टर शेतजमिनीपैकी ४० लाख हेक्टर जमीनपूर्णपणे कोरडवाहू आहे. या जमिनीवर फक्त खरिपाचीच पिके घेतली जातात. ही सर्वपिके पावसावर अवलंबून आहेत. शेतीला पाणी मिळावे म्हणून जायकवाडी, पूर्णा,विष्णुपुरी, ऊर्ध्व पैनगंगा, मांजरा, निम्न तेरणा हे मोठे सिंचन प्रकल्प उभे करण्यातआले. याशिवाय ७४ मध्यम प्रकल्प आणि ६१२ लघु प्रकल्प पूर्ण झाले आहेत. असेच प्रकल्प उर्वरित महाराष्ट्रात बांधण्यात आले आहेत. शेतीला दुबार पीक घेण्यासाठीसिंचन व्यवस्थेची गरज आहे. गेल्या ५० वर्षांत बांधल्या गेलेल्या धरणांचा उपयोगकोरडवाहू शेतीत दोन पिके घेण्यासाठी कोणाला झाला हे पाहिले तर लक्षात येईल की,दोन-पाच टक्के कोरडवाहू शेतकरी याचा फायदा घेऊ शकले. उर्वरित कोरडवाहूशेतकऱ्यांना एका पिकावरच संसार भागविणे भाग पडले. त्यांचे उत्पादन वाढू शकलेनाही. गेल्या ५० वर्षांत शेतीचे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे खूप तुकडे झाले.मराठवाड्यात १९९१ साली २३.९५ लाख खातेदार होते. त्यांपैकी एक हेक्टरच्या आतशेती असणारांची संख्या ३३.२५ टक्के होती. अशा एकूण ५७.४५ टक्के शेतकऱ्यांकडेमराठवाड्यातील एकूण जमिनीपैकी १४.१७ लाख हेक्टर जमीन होती. असे छोटेशेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर यांचाच दारिद्र्यरेषेखाली समावेश होता. आजहीग्रामीण भागात ५० टक्के लोक दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगत आहेत. त्यात कोरडवाहूअल्पभूधारकांची संख्या मोठी आहे. मराठवाड्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्यासंपत्तीचा काहींनी अभ्यास केला; तेव्हा असे लक्षात आले की, मराठवाड्यातील एकूणउत्पन्नापैकी ५८ टक्के उत्पन्न हे केवळ ०२ टक्के लोकांच्या हातात आहे. एक कुटुंब-एक उत्पन्नाचे साधन / ५३