पान:गाव झिजत आहे.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवसाय करणारे शेतकऱ्याला शेती मशागतीसाठी लागणारी अवजारे पुरवीत होते,एवढेच नव्हे तर त्यांच्या घराला लागणारे बांधकाम साहित्य, दरवाजे, खिडक्या,संदूक(पेटी), पाट, पलंग, खुंट्या, पाळणे अशा विविध लाकडी वस्तू तयार करून देतहोते. त्या काळी मजुरीची किंमत पैशात केली जात नव्हती. देवाण-घेवाण व्यवहारबहुतेक वेळा वस्तुरूपात व्हायचा. सुताराचेच उदाहरण घ्या. सुताराने शेतकरी कुटुंबालावरीलप्रमाणे वस्तू पुरवून सहकार्य करायचे आणि त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यानेत्याच्या कुटुंबाला वर्षभर लागणारे अन्नधान्य पुरवायचे. शेतकरी आणि इतर कारागीरम्हणजे सुतार, धोबी, न्हावी, तेली, तांबोळी, मांग, महार, शिंपी, कुंभार, सोनार,लोहार, चांभार, गवंडी अशा गावकामगारांशी हा व्यवहार क्वचितच पैशाच्या स्वरूपातहोत असे. बहुतेक वेळा श्रमाची देवाणघेवाण किंवा व्यवहारातील देवाण-घेवाण वस्तूंच्या रूपात होत होती. म्हणजे गावातील मजूर आणि गावकामगारांना अन्नधान्यपुरविण्याचे काम शेतकऱ्यांकडून होत होते. शेतकऱ्यांना इतर जीवनावश्यक वस्तूपुरविण्याचे काम गावकामगार आणि मजूर यांच्याकडून होत होते. एकमेकांच्यामदतीवरच गाव चालत होते. शेतकरी गावकामगाराच्या मदतीशिवाय आणिगावकामगार शेतकऱ्याच्या मदतीशिवाय एकेकटे जगणं कठीण होतं. गावातील सर्वजाती-जमाती, कारागीर, शेतकरी, मजूर परस्परांवर अवलंबून होते. याचा दुसरापरिणाम असा की गावात जाती, धर्म किंवा इतर कारणांवरून सहसा भांडणे होत नसत.घरगुती आणि संपत्तीच्या भांडणांचा निकालही गावातलीच चार बरी माणसं एकत्र येऊनदेत होते.  ही सर्व परिस्थिती लक्षात घेता असे लक्षात येते की गावाच्या बहुतांशी गरजागावातच भागवल्या जात होत्या. गावाच्या मूलभूत गरजा फार थोड्या होत्या. गावातीलसांस्कृतिक, धार्मिक आणि मनोरंजनाची जबाबदारीही गावातील ब्राम्हण, गोंधळी,जोगी, गोसावी, जंगम, गुरव हे भागवीत होते. या सर्वांचा परिणाम की काय गाव एकत्रआणि एकजुटीने राहण्याच्या बाजूने होता.परंतु २०व्या शतकाच्या उत्तरार्धात परिस्थिती हळूहळू बदलली. पाश्चिमात्यदेशात लागलेले शोध, औद्योगिक कारखाने भारतातही पोहचले. जीवनावश्यक वस्तूनिर्मितीला देश आला. या सुधारणा, त्या वस्तू आणि सोयी छोट्या-छोट्या शहरात मा औल्या. याचा परिणाम गावावर होत गेला. ग्रामीण भागाच्या दैनंदिन जीवनातलागणाऱ्या वस्तूशहरात सहज मिळू लागल्या. शहरातून कोणतीही वस्तू विकत आणणेप्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. लाकडाची शेतीची अवजारे गेली आणि त्याची जागालोखंडी अवजारांनी घेतली. शिंप्याची हातशिलाई कमी झाली आणि मशीनचा वापर. ४४ / गाव शिजत आहे