पान:गाव झिजत आहे.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कपडे शिवण्यासाठी होऊ लागला. चांभाराचा जोडा मागे पडला आणि मुलायम, सुबकवहाणा कारखान्यात तयार होऊ लागल्या. त्याचा वापर गावपातळीवर होऊ लागला.असेच इतर आवश्यक वस्तूंचेही झाले. गावाला जे पाहिजे होते ते शहरात तयार मिळूलागले. यामुळे हळूहळू गावातील परस्परावलंबित्व संपले. शेतकऱ्याला सुताराचीगरज वाटेनाशी झाली. कुंभाराची गरज वाटेनाशी झाली कारण बाजारात अॅल्युमिनियम,पितळ, लोखंडी, तांबे आदी धातूपासून तयार होणाऱ्या घागरी, लोटे, स्वयंपाकाचीभांडी मिळू लागले. लोखंडी नांगर, औत, विळे, खुरपे, कुदळीचा वापर शेतकरीआपल्या शेतीच्या कामात सर्रास करू लागला. तयार दागिने मिळू लागले, कपडे मिळूलागले. शेतीमालावर प्रक्रिया करून तयार झालेले अन्नपदार्थ तेल, गूळ, साखर इत्यादीमिळू लागली. याचा व्हायचा तो परिणाम गावावर झाला. शहरातून जीवनावश्यक वस्तूगावात आल्या. त्या सुबक होत्या, टिकावू होत्या आणि केव्हाही विकत मिळणाऱ्याहोत्या. त्यामुळे त्या विकत घेण्याचे आकर्षण ग्रामस्थांमध्ये वाढले आणि मगगावकामगारांची गरज भासेनाशी झाली. बार्टर पद्धतीचा व्यवहार संपला. त्याची जागापैशाच्या व्यवहाराने घेतली. मजुरांच्या, गावकामगारांच्या हातात वस्तूंच्या ऐवजी पैसापडू लागला. मग तेही शेतकऱ्यांवर अवलंबून न राहता पैसा खर्चुन धान्य आणिजीवनावश्यक वस्तू खरेदी करू लागले. एकमेकांच्या मदतीची गरज उरली नाही आणिजो तो स्वतंत्रपणे वागू लागला. अशा रीतीने परस्परावलंबित्व संपले.  या परिस्थितीचा जसा चांगला परिणाम गावावर झाला तसा वाईट परिणामहीगावाला भोगावा लागत आहे. आर्थिक स्वातंत्र्यामुळे प्रत्येक कुटुंबाला स्वत:च्याविचाराने वागण्याचे स्वातंत्र्य मिळाले. चार्तुवर्णाची शिडी मोडकळीस आली, आपलापरंपरागत व्यवसाय करण्याचे बंधन गावकामगारांवर राहिले नाही. आर्थिकस्वातंत्र्यामुळे भेदभाव निवळत गेला. हे एका दृष्टीने चांगलेच झाले. परंतु याचादुष्परिणाम गावाला भोगावा लागत आहे. २० व्या शतकातील बदलाचा सामाजिकसमता आणि स्वातंत्र्य मिळविण्यावर चांगला परिणाम झाला असला तरी गावची म्हणूनजी एकात्म संस्कृती होती ती हळूहळू नष्ट होत आहे. पूर्वी गावाच्या गरजा गावातीलकच्च्या मालावर प्रक्रिया करून भागवल्या जात होत्या. शिवारातले लाकूड तोडून शेतीअवजारे तसेच घरांची उभारणी होत होती. कुंभार परिसरातील मातीचा वापर करूनमाठ, रांजन, पणत्या तयार करीत होता. दावे-दोरखंड, वहाणा गावातील उपलब्धकच्च्या मालातूनच तयार होत होत्या. यामुळे गावातले श्रम गावं स्वावलंबी होण्यासकारणी लागत होते. नव्या गावाच्या उभारणीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे तत्त्वकायम ठेवून या पुढच्या काळात गाव स्वावलंबी कसे होईल याचा विचार होणे गरजेचे. परस्परावलंबी गाव-स्वावलंबी माव/ ४५