पान:गाव झिजत आहे.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शासनाचे जे कर्मचारी ग्रामीण भागासाठी विविध कामे करण्याकरिता नेमलेले असतात. ते गावातच राहिले तर ग्रामस्थांची वेगवेगळी कामे विलंब न लागता कशी होतील हे सांगतांना डॉ. द्वारकादास लोहिया यांनी या कर्मचाऱ्यांना हवी असणारी घरे बांधल्यास त्यांना गावात राहणे सक्तीचे करता येईल हे दाखवून दिले आहे.

    स्त्रियांच्या बचत गटांचे स्वागत करताना, या गटांमधून गावासाठी पतसंस्थानिघाली पाहिजे. त्या पतसंस्थेमधून शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना आवश्यक तेव्हा कर्ज मिळाले पाहिजेत आणि स्त्रियांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी योग्य ते भांडवल मिळाले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. द्वारकादास लोहिया यांनी केले आहे. गावचा पैसा

गावातच राहिला पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन यामागे आहे.

   आज शेतकरी केवळ कच्चा माल-धन्य, कापूस इ. निर्माण करतो. पूर्वी गावात तेली शेंगदाणा व करडई यांच्यापासून तेल काढीत असे. कुंभार गावाला लागणारी गाडगी, मडकी तयार करीत असे. शेतकऱ्यांची अवजारे दुरुस्त करण्याचे काम लोहार करीत असे. बांबूपासून बुरूड टोपल्या तयार करीत असे. कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचे काम गावातच झाले पाहिजे असे डॉ. लोहिया यांनी

आग्रहपूर्वक सांगितले आहे. आज छोट्या कामांसाठीही शेतकरी हरात जातो हे योग्य नाही अशी त्यांची भूमिका आहे.

    जे धान्य तसेच जो भाजीपाला पिकवितो, किंवा जी फळावळ

निर्माण करतो त्याची किंमत बाजारात दलाल, अडते ठरवितात आणि शेतकऱ्यालाअनेकदा उत्पादन खर्चाइतकाही पैसा त्याच्या उत्पादनाच्या विक्रीतून मिळत नाही.कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी या परिस्थितीत बदल घडवून न आणल्यामुळे शेतकरी लुटला जातो हे डॉ. लोहिया यांनी ठसठशीतपणे सांगितले आहे. शेती हा व्यवसाय,उद्योग आहे हे सत्य लक्षात ठेवून शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार असला पाहिजे हे सांगतांना डॉ. द्वारकादास लोहिया यांनी उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव शेतमालाला बाजारात मिळत सल्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, हे सडेतोडपणे मांडले आहे.

  समाजात एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे आणि गावामध्ये ग्रामस्थांनी शेजारधर्म पाळला पाहिजे, तसेच जल, जंगल, जमीन यांच्यावर समस्त गावकऱ्यांचीच मालकी असली पाहिजे अशी भूमिका डॉ. द्वारकादास लोहिया यांनी सांगितले आहे .

सहा 'ठळक मजकूर'''तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर'''/ गाव झिजत आहे.