पान:गाव झिजत आहे.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मजकूर'ठळक मजकूर'मांडली आहे. राजकीय सत्ता आणि अर्थसत्ता यांचे विकेंद्रीकरण करून ग्रामपंचायती आणि पंचायत समित्या{} सक्षम कशा बनविता येतील हे या पुस्तकात डॉ. द्वारकादास लोहिया यांनी स्पष्टपणे मांडले आहे. ग्रामीण शिक्षण व्यवस्थेबद्दलचे त्यांचे विचार मला फार उद्बोधक वाटले. फक्त अत्युच्च शिक्षणाच्या सुविधा शहरात असल्या पाहिजेत बाकी सर्व त-हेचेशिक्षण मुलामुलींना त्यांच्या गावातच किंवा फारतर पंचक्रोशीतच मिळाले पाहिजे. या शिक्षणामधून आजच्या समाजव्यवस्थेत जी कौशल्ये आवश्यक आहेत ती त्यांना आत्मसात करता आली पाहिजेत. गावातील पाण्याचे पंप, शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी, गोबरगॅस प्लँटस् दुरुस्त करण्याचे शिक्षण गावातील काही मुलामुलींना मिळाले पाहिजे. त्यासाठी शहरातील कामगाराकडे शेतकऱ्यांना जावे लागता कामा नये. ही कौशल्य शिकविली तर गावातील तरुणांना व तरुणींना गावातच रोजगार मिळू शकेल.

    आज तंत्र विज्ञान क्षेत्रामध्ये जी प्रगती झाली आहे, माहिती तंत्रज्ञानामुळे एकूण समाजव्यवस्थेत जे बदल झाले आहे त्यांचे चिकित्सक मूल्यमापन करून डॉ. द्वारकादास लोहिया यांनी म. गांधीजींच्या विचारांच्या आधारेच आपल्याला ग्रामीण जीवनाची पुनर्रचना करावी लागेल असे प्रतिपादन केले आहे.
     आज "गाव झिजत आहे "आणि ते अधिक वेगाने झिजत जाऊन श्रमजीवी ग्रामीण जनता विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकली जाईल असा इशारा या पुस्तकाव्दारे डॉ. द्वारकादास लोहिया यांनी दिला आहे. हे उद्बोधक पुस्तक जे कार्यकर्त्यांना मार्गदर्शक होईल. असे पुस्तक लिहिल्याबद्दल मी डॉ. द्वारकादास लोहिया यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.
                                                       ग. प्र. प्रधान
                                                महाराष्ट्र आरठळक मजकूर'ठळक मजकूर,
                                                      हडपसर, पुणे.
                                                दिनांकः १८ जून २००७''ठळक मजकूर''''''ठळक मजकूर

'


गाव झिजत आहे/ सात 'ठळक मजकूर''''ठळक मजकूर''''ठळक मजकूर'''''''